साताऱ्यातील उंब्रजमध्ये पठाण चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले; मात्र, पुन्हा पोलिस संरक्षणात शो सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 03:43 PM2023-01-25T15:43:52+5:302023-01-25T15:50:49+5:30

गेल्या काही दिवसापासून पठाण चित्रपटावर बराच वाद

Screening of Pathan movie stopped in Umbraj in Satara, but show resumes under police protection | साताऱ्यातील उंब्रजमध्ये पठाण चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले; मात्र, पुन्हा पोलिस संरक्षणात शो सुरु

साताऱ्यातील उंब्रजमध्ये पठाण चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले; मात्र, पुन्हा पोलिस संरक्षणात शो सुरु

Next

अजय जाधव

उंब्रज: येथील चित्रपटगृहात अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. याबाबत माहिती मिळताच हिंदू एकता आंदोलनचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष  महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला चित्रपट प्रदर्शित करू नये यासंबंधी निवेदन दिले. निवेदन दिल्या नंतर व्यवस्थापनाने बाराचे प्रदर्शन थांबवले होते. तीनचा शो पोलिस संरक्षणात सुरू करण्यात आला आहे.

या निवेदनानुसार, सदर चित्रपटात भगव्या रंगाची जाणीवपूर्वक विटंबना केल्यामुळे हिंदू समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे तात्काळ ह्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अशी  मागणी हिंदू एकतेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदनाची दखल घेत व्यवस्थापनाने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. पण पुन्हा तीनचा शो पोलिस संरक्षणात सुरू करण्यात आला आहे.

यावेळी हिंदू एकता आंदोलन कराड उत्तर तालुकाध्यक्ष  महेश जाधव, विक्रम माने, मिटु वाघमारे, राजेंद्र यादव, दीपक हजारे, संजय पाटील, शंकर मोरे, अप्पा सोनवणे, तसेच शुभम जाधव उपस्थित होते.

Web Title: Screening of Pathan movie stopped in Umbraj in Satara, but show resumes under police protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.