शोध नव्या व्यवस्थापनाचा--आनेवाडी टोल नाक्यावर हक्क सांगणाºया ‘मॅक्रोलाईन’ कंपनीचं मूळ सुपने-तांबवेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:58 PM2017-10-06T23:58:27+5:302017-10-06T23:59:53+5:30

कºहाड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलाचा वाद आता टोकाला पोहोचला आहे.

Search New Management - The Origin of the McLaren Company Claiming to Toll Naka ... | शोध नव्या व्यवस्थापनाचा--आनेवाडी टोल नाक्यावर हक्क सांगणाºया ‘मॅक्रोलाईन’ कंपनीचं मूळ सुपने-तांबवेत...

शोध नव्या व्यवस्थापनाचा--आनेवाडी टोल नाक्यावर हक्क सांगणाºया ‘मॅक्रोलाईन’ कंपनीचं मूळ सुपने-तांबवेत...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलाचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. गुरुवारी तर दोन्ही राजे आमने सामने ठाकलेत. मूळच्या अशोका कंपनीकडून हा व्यवस्थापनाचा ठेका कोल्हापूरच्या मॅक्रोलाईन कंपनीकडे सोपवायच्या प्रक्रियेवरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे समर्थकांमध्ये राडाही झालाय; पण साताºयाच्या या राजेंच्या वादाला कºहाडची फोडणी बसल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

महामार्गावरील टोलनाके आता राजकारणासाठी आपल्या वरदहस्ताखाली चालावेत, असे प्रत्येक राजकारण्याला वाटू लागले आहे. आनेवाडी-खेडशिवापूर टोलनाकाही त्याला अपवाद नाही. गेल्या काही वर्षांपासून सोलापूरच्या अशोका कंपनीकडे याच्या व्यवस्थापनाचा ठेका होता. मात्र, प्रत्यक्षात खासदार उदयनराजे भोसले समर्थक हा टोल चालवित होते.

हा व्यवस्थापनाचा ठेका नव्याने कोल्हापूरच्या मॅक्रोलाईन कंपनीने घेतला आहे. गुरुवार, दि. ५ रोजी पहिल्या ठेक्याची मुदत संपून तो नव्या कंपनीकडे हस्तांतरीत करायचा होता. मात्र, तत्पूर्वीच खासदार उदयनराजे भोसले समर्थकांसह टोलनाक्यावर गेले. व्यवस्थापन बदलाला विरोध दर्शवित त्यांनी सर्व वाहने मोफत सोडायला लावली.दरम्यान, नव्याने ठेका घेतलेली मॅक्रोलाईन ही कंपनी कोल्हापूरची आहे म्हणे. त्याचे पदाधिकारी गुरुवारी रात्री साताºयाच्या सुरुचिवर बसले होते.

मॅक्रोलाईनच्या माध्यमातून हा ठेका संजय पाटील यांना मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे साताºयात उदयनराजेंना चेकमेट देत टोलनाक्याचा ठेका घेणारे हे संजय पाटील आहेत तरी कोण, याबाबत अनेकांची उत्सुकता ताणली गेली. तर सध्या मुंबईस्थित असणारे हे संजय पाटील मूळचे कºहाड तालुक्यातील सुपने-तांबवे गावचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुपने-तांबवे गावचे हे पाटील नेमके कोण, ते कुठे राहतात, त्यांचे गावाकडे कोण राहते, अशा चर्चा शुक्रवारी कºहाड परिसरामध्ये दिवसभर सुरू होत्या.
संजय पाटील यांचे मूळगाव सुपने-तांबवे असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य मुंबईत असते. अलीकडे त्यांचे गावाकडे फारसे येणे जाणेही नसल्याचे या परिसरातील ग्रामस्थ सांगतात.

आशीर्वाद कुणाचा?
आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनात बदलाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला या संजय पाटलांना फलटणकरांचा आशीर्वाद असल्याची चर्चा झाली. साताºयाचे ‘बाबा महाराज’ही त्यांच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे. या पाटलांचीअनेक मोठ्या राजकीय नेत्यांसोबत ऊठबस असल्याचेही सांगितले जाते.
दिवाळीनंतर फुटणार बदलाचा बार!
सध्या सातारा राजधानीतील वातावरण चांगलेच पेटल्याचे दिसते. आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन बदल हे त्यामागचे कारण आहे. मात्र, दोन राजेंतील या संघर्षामुळे याला वेगळीच धार आली आहे. परिणामी, तुर्तास तरी व्यवस्थापन बदलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे सांगितले जातेय. दिवाळीनंतर बदलाचा बार आणि फटाकेही फुटणार असल्याची चर्चा तरुण कार्यकर्त्यांच्यात आहे.

Web Title: Search New Management - The Origin of the McLaren Company Claiming to Toll Naka ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.