सिव्हिल रुग्णालयात डान्स करणाºया सहाजणांना सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:55 AM2018-01-30T00:55:39+5:302018-01-30T00:55:45+5:30

सातारा : सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असताना जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये डान्स करणाºया सहाजणांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने

 Seasonal bail to six people in civil hospital | सिव्हिल रुग्णालयात डान्स करणाºया सहाजणांना सशर्त जामीन

सिव्हिल रुग्णालयात डान्स करणाºया सहाजणांना सशर्त जामीन

Next

सातारा : सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असताना जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये डान्स करणाºया सहाजणांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत त्यांना जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश दिले.

आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन हस्तांतरणाप्रकरणी सुरुचि बंगल्यासमोर झालेल्या धुमश्चक्रीत आमदार व खासदार समर्थकांना अटक करण्यात आली. दरम्यान, काहींनी आजारी असल्याचे कारण दाखवित स्वत:ला जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये दाखल करून घेतले. त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळताच खासदार समर्थक इम्तियाज बागवान, बाळू ढेकणे, विशाल ढाणे, केदार राजेशिर्के, विक्रम शेंडे व किरण कुºहाडे यांनी मोबाईलवर गाणी लावून डान्स केला.

या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयात अहवाल सादर करीत आरोपींचा जामीन मंजूर करू नये, अशी मागणी केली होती. आरोपींच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश वाय. एस. अमेठा यांनी सहाजणांचा जामीन मंजूर केला.

फोनवरून रोज माहिती देण्याचे निर्बंध
या सहाही आरोपींनी जामीन मिळाल्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत जिल्ह्याबाहेरच राहावे. दर आठवड्यातून दोनवेळा शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरीला यावे. तसेच तपास अधिकाºयांना फोनद्वारे रोजच्या ठिकाणाबाबत माहितीही द्यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title:  Seasonal bail to six people in civil hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.