मलकापुरात कडक निर्बंधांच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांसह पालिका आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:29+5:302021-05-06T04:41:29+5:30
मलकापूर : ‘ब्रेक द चेन’ हा शासनाने पंधरा दिवसांचा अंशतः लॉकडाऊन केला आहे. कडक निर्बंधांच्या दुसऱ्या दिवशी मलकापुरात पोलिसांसह ...
मलकापूर : ‘ब्रेक द चेन’ हा शासनाने पंधरा दिवसांचा अंशतः लॉकडाऊन केला आहे. कडक निर्बंधांच्या दुसऱ्या दिवशी मलकापुरात पोलिसांसह पालिका प्रशासन आक्रमक झाले होते. बुधवारी पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने कारवाईची धडक मोहीम राबवली.
पालिकेच्या भरारी पथकांनी नऊ दुकानांवर दंडात्मक कारवाई करत चार हजार ५०० रुपये दंड वसूल केला, तर पोलिसांनीही शिवछावा चौकात वाहनांसह नागरिकांची कसून चौकशी करत विनाकारण फिरणाऱ्यांच्या ११ दुचाकी ताब्यात घेत तीन हजार रुपये दंड वसूल केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशनुसार मलकापूर शहरात विविध ठिकाणी चार पथकांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणारे नागरिक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पालिकेने भरारी पथकाद्वारे दंडात्मक कारवाईसाठी चार पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये पथक प्रमुख म्हणून राजेश काळे, शशिकांत पवार, ज्ञानदेव साळुंखे व रमेश बागल यांची नियुक्ती केली आहे, तर रामचंद्र शिंदे, संजय घाडगे, सागर निकम, अंकुश गावडे, सोमनाथ गावडे, राहुल अडसूळ, आत्माराम मोहिते, विक्रम सिद, शशिकांत राजे, पंकज बागल, सुभाष बागल, प्रसाद बुधे, सुनील शिंदे, वैभव आरणे, हेमंत पलंगे, तेजस शिंदे, नीलेश पाटील, अतुल सुतार या कर्मचाऱ्यांची कारवाईसाठी प्रत्येक पथकामध्ये पाच अशी नियुक्ती केली आहे. या पथकांनी बुधवारी शहरातील विविध विभागांत एकाचवेळी नऊ व्यावसायिक व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ४ हजार ५०० रुपये व पोलिसांनी ३ हजार असा एकूण ७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
चौकट
नियम मोडणारी दुकाने
साज फर्निचर, हिंदुस्थान पेंट, मोहळकर प्लास्टिक हाऊस, नष्टे किराणा, संकेत शॉपी, डिलक्स ऑटोमोबाईल, हिंदुस्थान मार्बल, हाॅटेल श्रीराम, देवकर फ्लोअर मिल.
चाैकट..
मलकापुरातील सहा ठिकाणी नाकाबंदी
मलकापूर फाटा, कोल्हापूर नाका, शिवछावा चौक, आगाशिवनगर परिसर, बैलबाजार रस्ता, पाचवड फाटा
(चौकट)
११ दुचाकी जप्त
शिवछावा चौकात पोलिसांनी योग्य कारणाशिवाय फिरणाऱ्या चालकांकडून ११ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत, तर विनामास्क फिरणाऱ्या चौघांवर दंडात्मक कारवाई केली.
०५मलकापूर
मलकापुरात पालिकेच्या भरारी पथकांनी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नऊ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली.
( छाया - माणिक डोंगरे)