कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:06+5:302021-05-15T04:38:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस पहिल्यानंतर १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस पहिल्यानंतर १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू आहे. केंद्र शासनाच्या १३ मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्वी कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशा नागरिकांना १५ मेपासून या लसीचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्याच्या (८४ ते ११२ दिवस) दरम्यान देण्यात येणार आहे. याबाबतचा बदल कोविन ॲपमध्ये करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी या लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनी दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर जावे. विनाकारण गर्दी करू नये. तसेच आरोग्य विभागास सहकार्य करावे.