‘कृष्णा’कडून २०० रुपयांचा दुसरा हप्ता पुढील आठवड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:31+5:302021-06-06T04:29:31+5:30

कोरोनाच्या संकटकाळात कृष्णा कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने, शेतकऱ्यांना मोठा दिलासा ...

Second installment of Rs 200 from Krishna next week | ‘कृष्णा’कडून २०० रुपयांचा दुसरा हप्ता पुढील आठवड्यात

‘कृष्णा’कडून २०० रुपयांचा दुसरा हप्ता पुढील आठवड्यात

googlenewsNext

कोरोनाच्या संकटकाळात कृष्णा कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पेरणी, खते खरेदीसह शेतीची अन्य कामे करण्यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. कृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. कृष्णा कारखान्याने सन २०२०-२१ च्या गळीत हंगामात १५४ दिवसांमध्ये १२ लाख १५ हजार १७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १४ लाख ७६ हजार २०० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.७५ टक्के इतका राहिला आहे.

कृष्णा कारखान्याने यापूर्वी शेतकरी सभासदांना २६०० रुपयांचा पहिला हप्ता अदा केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने एफआरपीचा दुसरा हप्ता २०० रुपयांप्रमाणे देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, ऊस बिलाची ही रक्कम पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहेत. ही रक्कम वर्ग झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी प्रतिटन एकूण २ हजार ८०० रुपये प्राप्त होणार आहेत.

फोटो : ०५ सुरेश भोसले

Web Title: Second installment of Rs 200 from Krishna next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.