भारतातील दुसरी नाईट मॅरेथॉन साताऱ्यात - स्पर्धकांचा रात्रीचा सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 08:51 PM2018-05-29T20:51:40+5:302018-05-29T20:51:40+5:30
संपूर्ण भारतात खऱ्या अर्थाने नाईट मॅरेथॉन ही एकमेव बेंगलोरला होते, त्यानंतर भारतात अशी ही दुसरी आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशी नाईट मॅरेथॉन २ जून रोजी साताऱ्यात होणार
सातारा : संपूर्ण भारतात खऱ्या अर्थाने नाईट मॅरेथॉन ही एकमेव बेंगलोरला होते, त्यानंतर भारतात अशी ही दुसरी आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशी नाईट मॅरेथॉन २ जून रोजी साताऱ्यात होणार आहे, गेले दोन वर्षे साताºयात फारसा गाजावाजा न करता सातत्याने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणारी एक मोफत एन्ट्री असलेली तीन, पाच, दहा किलोमीटरची मॅरेथॉन आपल्याला कदाचित माहीत असेल, इलसोमच्या टीमने साताऱ्यात पहिली फूल मॅरेथॉन घ्यायचे ठरवले, तशी गेले नऊ महिने तयारी केली.
सकाळी वेळ न मिळाल्यास रात्रीदेखील पळू शकता, व्यायाम करू शकता हा संदेश देणारी, दैनंदिन ट्रॅफिकला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन रात्रीचे नियोजन करण्यात आले. तसेच साताºयात प्रथमच फूल डिस्टन्स म्हणजेच ४२.१९ किलोमीटर अंतरची मॅरेथॉन करायचे ठरवले.
१ जानेवारी रोजी या मॅरेथॉनची आॅनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आणि ३१ जानेवारीला संपली देखील. संपूर्ण भारतातून, बेंगलोर, दिल्ली, दार्जिलिंग, नागपूर, जालना, सोलापूर, चेन्नई अशा वेगवेगळ्या शहरांतून सिरिअस रनर्सनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला असून, साताऱ्यातील १६६ आणि बाहेरून ५५६ अशा एकूण ७२२ रनर्सनी भाग घेतला आहे. ३१ जानेवारीनंतर किमान ५०० रनर्सना रजिस्ट्रेशन नाकारावे लागले, कारण नाईट मॅरेथॉनचे पहिले एडिशन, फूल मॅरेथॉनचे मोठे डिस्टन्स आणि बाहेरून येणाºया इतक्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी या टीमने प्रथमच पेलायची आहे. त्यामुळे आता पुढच्या १ जानेवारीला नावनोंदणी करा’ असे खूपजणांना सांगावे लागले.
२ जून रोजी रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेमध्ये रनर्सना प्रोत्साहन द्यायला सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एएफएसएफ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
असा असेल मॅरेथॉनचा मार्ग
ही नाईट मॅरेथॉन, रात्री अकरा वाजता शाहू स्टेडियम येथून सुरू होऊन राधिका रोड, गोलमारुती मंदिर, समर्थ मंदिर, अदालतवाडा रोड, नगरपालिका चौक, कमानी हौद, मोती चौक, ५०१ पाटी, पोलीस हेडक्वार्टर, गीते बिल्डिंग, चुना भट्टी रोड, पोवई नाका, मोनार्क हॉटेल, कलेक्टर आॅफिस, झेडपी चौक, विसावा नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट आणि परत स्टेडिअम अशी असणार आहे.