जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:38+5:302021-03-05T04:39:38+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात १ मार्चपासून कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना तसेच ...

The second phase of covid vaccination started in the district | जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

Next

सातारा : सातारा जिल्ह्यात १ मार्चपासून कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना तसेच ४५ वर्षांवरील कोमोर्बीड (व्याधी असणारे) नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस घेताना नागरिकांनी आधी आपले रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

लस घेताना नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. जिल्ह्यात असणाऱ्या लोकसेवा केंद्रामध्येही रजिस्ट्रेशन करता येईल. येथे नागरिकांना केवळ पाच रुपये शुल्क आकारुन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तसेच मोबाईल अ‍ॅपवरूनही नोंदणी करता येईल. ४५ वर्षांवरील व्याधी असणाऱ्या नागरिकांनी कोविड वेबसाईटवरील आजारांची यादी तपासून घ्यावी. लवकरच खासगी रुग्णालयांतदेखील लस उपलब्ध होणार असून, त्याची किंमत २५० रुपये इतकी राहील, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

तसेच नोंदणीकृत खासगी आरोग्य संस्था ओंन्को लाईफ क्लिनिक तामाजाईनगर, सातारा, संजीवन हॉस्पिटल, सातारा, कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय, कराड, सह्याद्री हॉस्पिटल, कऱ्हाड, शारदा हॉस्पिटल, कऱ्हाड, गुजर मेमोरियल हॉस्पिटल, कऱ्हाड, मानसी मेमोरियल हॉस्पिटल, खंडाळा, पाटील हॉस्पिटल, कोरेगाव, मंगलमूर्ती क्लिनिक, सातारा, घोटवडेकर हॉस्पिटल, वाई या ठिकाणी रुपये २५0 रुपये प्रती डोसप्रामणे शुल्क घेऊन लस देण्यात येणार आहे.

चौकट..

३९ शासकीय व १० खासगी आरोग्य संस्थेत लसीकरण

४५ वर्षांवरील ते ५९ वर्षे वयोगटातील कोमोर्बीड (हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार) असणाऱ्या व्यक्तींना व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीमध्ये ३९ शासकीय व १० खासगी आरोग्य संस्थेत लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा, उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण. ग्रामीण रुग्णालय, पाटण, ढेबेवाडी, कोरेगाव, दहिवडी, खंडाळा, वडूज, महाबळेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड, चिंचणेर वं., नागठाणे, कण्हेर, काले, उंब्रज, पुसेगाव, पाचगणी, अहिरे, बावधन, कवठे, कुडाळ, तारळे, मळमावले, मायणी, पुसेसावळी, मार्डी, मलवडी, राजाळे, साखरवाडी, वाठार स्टेशन, रहिमतपूर तसेच नागरी आरोग्य केंद्र, गोडोली, पुज्य कस्तुरबा, फलटण या शासकीय रुग्णलयांमध्ये (सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत) कोविड-१९ चे लसीकरण मोफत देण्यात येणार आहे.

Web Title: The second phase of covid vaccination started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.