प्रत्येक क्षेत्रात सुरक्षिततेला प्राधान्य हवेच : नागनाथ स्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:35 AM2021-01-21T04:35:13+5:302021-01-21T04:35:13+5:30
वडूज : ‘जीवन अमूल्य आहे, म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जीवन सुरक्षिततेला प्राधान्य घ्यायलाच हवे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक ...
वडूज : ‘जीवन अमूल्य आहे, म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जीवन सुरक्षिततेला प्राधान्य घ्यायलाच हवे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सातारा जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी यांनी केले.
वडूज येथील राज्य परिवहन आगाराच्यावतीने आयोजित सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहायक कार्यशाळा अधीक्षक शुभम रणवरे होते.
प्रा. स्वामी म्हणाले, ‘रस्ते वाहतूक करताना बसमधील प्रवाशांइतकाच रस्त्यावरील पादचारीही महत्त्वाचा आहे, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. यासाठी चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी, आपणावर फार मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यावे.’
वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास लेखाकार भीमराव कांबळे, वाहतूक निरीक्षक पी. वी. सानप, अरुण जाधव, प्रवीण कचरे, विकास लावंड, नानासाहेब खाडे, चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.
२०वडूज
फोटो:
महाराष्ट्र राज्य परिवहन सुरक्षितता मोहिमेदरम्यान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. नागनाथ स्वामी. ( शेखर जाधव )