अजिंक्यतारावर बीज गोळे, झाडांचे रोपण

By admin | Published: July 10, 2017 02:51 PM2017-07-10T14:51:28+5:302017-07-10T14:51:28+5:30

वात्सल्य फाऊंडेशनतर्फे खड्डे काढून वृक्षारोपण

Seed balls, seedlings planting on Ajinkya | अजिंक्यतारावर बीज गोळे, झाडांचे रोपण

अजिंक्यतारावर बीज गोळे, झाडांचे रोपण

Next


आॅनलाईन लोकमत


सातारा, दि.१0 : सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर वात्सल्य फाऊंडेशनच्यावतीने ४०० जंगली झाडे व ३००० बीज गोळे यांचे खड्डे काढून वृक्षारोपण करण्यात आले. वात्सल्य फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार व कोरेगाव तालुक्याचे आमदार शशिकांत शिंदे तसेच वनविभागाचे धुमाळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

सातारा शहरातील सर्व कॉलेजला अजिंक्यतारा वृक्षारोपणासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला लाल बहादूर शास्त्री कॉलेजने प्रतिसाद देऊन १५० जंगली झाडांची रोपे लावली.
अजिंक्यतारा येथील मंगळाई देवी (पायथ्याजवळ) वृक्षारोपणांचा कार्यक्रम करण्यात आला. एल.बी.एस. कॉलेजचे सर्व कर्मचारी विद्यार्थी मिळून १५० लोक हजर होते. एल.बी.एस. कॉलेजचे प्राचार्य शेजवळ, व उप्राचार्य जाधव, बिरजे, डुके आदी उपस्थितीत होते.

रणजित सावंत, विकास बाबर, पप्पू कासकर, खामकर, दीपक ननावरे, संतोष जगदाळे, मनीषा उधाणी, विकास जाधव, चंदू भोसले, चेअरमन भोसले, दीपक अग्रवाल, सुनील त्रिंबके, गणपत शिंदे, राजेश भाटिया, सांबारे, सावंत, आबा भोसले, आबा केंजळे, प्रताप फाळके, पतंगराव जाधव (भाऊ), अजय शिराळ, मंगेश जाधव, आबा केंजळे, संदीप जाधव आदी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ही झाडे जगविण्याचीही यावेळी शपथ घेण्यात आली.

Web Title: Seed balls, seedlings planting on Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.