आशिष पवार यांची सहायक शास्त्रज्ञपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:16+5:302021-07-16T04:27:16+5:30

औंध : केंद्र शासनाच्या कपूरथळा (जालंधर) येथील ‍ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोएनर्जीमध्ये औध येथील डॉ. आशिष पवार ...

Selection of Ashish Pawar as Assistant Scientist | आशिष पवार यांची सहायक शास्त्रज्ञपदी निवड

आशिष पवार यांची सहायक शास्त्रज्ञपदी निवड

Next

औंध : केंद्र शासनाच्या कपूरथळा (जालंधर) येथील ‍ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोएनर्जीमध्ये औध येथील डॉ. आशिष पवार यांची सहायक शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे काैतुक होत आहे.

खटाव येथील प्राथमिक शाळेत डॉ. आशिष यांचे प्राथमिक शिक्षण पार पडले. माध्यमिक शिक्षण श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण शहाजीराजे महाविद्यालयात झाले. पुढील शिक्षणामध्ये कोकण कृषी विद्यापीठातून बी. टेक. ॲग्री इंजिनीअरिंग तर राजस्थानच्या उदयपूर येथील महाराणा प्रताप विश्वविद्यालयातून एमटेक व पीएच.डी. प्राप्त केली. भोसरे येथील श्री हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. एल. पवार यांचे ते चिरंजीव आहेत.

या यशाबद्दल चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील, संस्थेचे पदाधिकारी आदींनी त्यांचे काैतुक केले.

हाफ फोटो...

...............................................................................................................................

Web Title: Selection of Ashish Pawar as Assistant Scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.