स्पर्धा परीक्षेतून झालेली निवड प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:36 AM2021-03-06T04:36:30+5:302021-03-06T04:36:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आरफळ, ता. सातारा येथील प्रथमेश उमेश पवार याची स्पर्धा परीक्षेतून सेन्ट्रल आर्मड पोलीस फोर्सच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आरफळ, ता. सातारा येथील प्रथमेश उमेश पवार याची स्पर्धा परीक्षेतून सेन्ट्रल आर्मड पोलीस फोर्सच्या असिस्टन्ट कमांडन्ट या क्लास वन पदासाठी झालेली निवड ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे, असे मत शिक्षक नेते सिध्देश्वर पुस्तके यांनी व्यक्त केले,
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेत देशात ३ रा व राज्यात १ ला क्रमांक मिळवून असिस्टन्ट कमांडन्ट या पदाकरिता निवड झालेबद्दल प्रथमेशचा आरफळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष, शिक्षक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आरफळचे सरपंच सुनील पवार, सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हा. चेअरमन अनिल जायकर, विद्यमान संचालक दत्तात्रय कोरडे, प्रवीण घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक दीपक पवार व स्वागत नितीन राजे यांनी केले. आभार राजेंद्र लोखंडे यांनी मानले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षासाठी पात्र व्हावेत यासाठी प्राथमिक स्तरापासून प्रयत्न करण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या अध्ययन अनुभवामध्ये कोणते बदल शिक्षकांनी करावेत, कोणकोणते नवोपक्रम राबवावेत याकरिता प्रथमेश याची मुलाखत घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
समारंभासाठी हेमंत इथापे, कुलदीप मोरे, अमर वंजारी, राहुल फाळके, रामा लवळे, बाळकृष्ण जगताप, चंद्रकांत चव्हाण, सतीश जाधव, किशोर मतकर, शांताराम वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
---
फोटो ओळ : प्रथमेश पवार याचा सत्कार करताना सिध्देश्वर पुस्तके. समवेत अनिल जायकर, प्रवीण घाडगे, दत्तात्रय कोरडे आदी.