Satara: संदेश थोरात यांची 'लेप्टनंट'पदी निवड

By प्रमोद सुकरे | Published: June 16, 2023 03:25 PM2023-06-16T15:25:17+5:302023-06-16T15:26:15+5:30

महाराष्ट्रातून ६ जणांची लेप्टनंट म्हणून निवड

Selection of Sandesh Thorat as Lieutenant | Satara: संदेश थोरात यांची 'लेप्टनंट'पदी निवड

Satara: संदेश थोरात यांची 'लेप्टनंट'पदी निवड

googlenewsNext

कराड : रहाटणी (ता.खटाव) येथील मूळचे रहिवासी व सध्या सैदापूर (कराड) येथील संदेश संजय थोरात यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात लेप्टनंटपदी निवड झाली आहे.

संदेश थोरात यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कराड येथे पूर्ण केले आहे.नंतर औरंगाबाद येथील सैनिक प्रशिक्षण संस्थेत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम सी ई एम इ मधून त्यांनी बी टेक पूर्ण केले .नुकतेच भारतातून ६६ तर महाराष्ट्रातून ६ जणांची लेप्टनंट म्हणून निवड झाली. त्यात संदेश थोरात यांचा समावेश आहे.

संदेश थोरात यांचे आजोबा साहेबराव थोरात ही सैन्य दलात कार्यरत होते. ते सुभेदार म्हणून निवृत्ती झाले आहेत. त्यांचा देश सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी संदेश थोरात सैन्य दरात दाखल झाले असून त्यांची 'आर्टिलरी रेजिमेंट' मध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Selection of Sandesh Thorat as Lieutenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.