दक्षता कमिटीवर सविता आवळे-पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:26 AM2021-07-16T04:26:41+5:302021-07-16T04:26:41+5:30
दहिवडी : राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार सार्वजनिक वितरण व व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात ...
दहिवडी : राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार सार्वजनिक वितरण व व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा दक्षता समिती गठित केलेली असून, या जिल्हा दक्षता समितीवर राष्ट्रवादीच्या सविता चांगदेव आवळे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
आवळे-पाटील या माण तालुक्यातील पांगरी गावच्या असून, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सदस्य आहेत. सविता आवळे-पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, सभापती श्रीराम पाटील, जिल्हा नियोजन कमिटीच्या माजी सदस्य डॉ. भारती पोळ, महिला व बालकल्याण सभापती सोनाली मनोज पोळ, पद्मिनी गायकवाड, सुनील पोळ, प्रा. कविता म्हैत्रे, बाळासाहेब सावंत, बाबूराव काटकर, तानाजी कट्टे-पाटील, पाटलूनाना गायकवाड, अमोल काटकर, सरपंच किरकसाल, राजेंद्र देशमुख, शहाजी दडस, लालासाहेब दडस, प्रा. विश्वंबर बाबर, विजयकुमार मगर यांनी अभिनंदन केले आहे.
१५ सविता आवळे-पाटील