‘कृष्णा’च्या तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग देसाई, दीपक पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:13+5:302021-08-18T04:46:13+5:30
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग शंकर देसाई (आणे, ता. कऱ्हाड) आणि दीपक ...
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग शंकर देसाई (आणे, ता. कऱ्हाड) आणि दीपक वसंतराव पाटील (तांबवे, ता. वाळवा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्याहस्ते या नूतन तज्ज्ञ संचालकांचा सत्कार करण्यात आला.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने ११,००० मताधिक्य मिळवून सर्व जागांवर विजय संपादन केला. कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग देसाई, दीपक पाटील यांची निवड करण्यात आली.
श्रीरंग देसाई व दीपक पाटील दोघांनीही कृष्णा कारखान्यात यापूर्वी माजी संचालक म्हणून काम पाहिले आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ते सहकार, ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. या कार्याची दखल घेत डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, लिंबाजीराव पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, विलास भंडारे, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, बँक प्रतिनिधी शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, सचिव मुकेश पवार उपस्थित होते.
फोटो : १७कृष्णा कारखाना
शिवनगर ता. कऱ्हाड येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग देसाई, दीपक पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप उपस्थित होते.