स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन चिघळले, साताऱ्यातील इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला

By प्रमोद सुकरे | Published: November 17, 2022 11:39 AM2022-11-17T11:39:07+5:302022-11-17T11:48:51+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संशयित म्हणून घेतले ताब्यात

self-respecting sugarcane ban movement raged In Karhad in Satara, sugarcane tractor was set on fire in Indoli | स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन चिघळले, साताऱ्यातील इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला

स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन चिघळले, साताऱ्यातील इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला

Next

कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, दि. १७ व उद्या १८ नोव्हेंबरला दोन दिवसाचे राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन कराड तालुक्यात चिघळले असून इंदोली येथे काल, बुधवारी रात्री उशिरा अज्ञाताने ऊस वाहतूक करणारा एक ऊस ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यामुळे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साखर कारखानदारांनी विना कपात एकरकमी एफ.आर.पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे अशी स्वाभिमानीची मागणी आहे. मात्र यामागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, दि. १७ व उद्या १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या २ दिवसात शेतकऱ्यांनी ऊसतोडी करु नये. रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे. असे आवाहन संघटनेने केले होते.

या आंदोलनाला अनेक ऊसतोड वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नेहमी सारखा संघर्ष होणार नाही असा विश्वासही व्यक्त केला होता. पण बुधवारी रात्री इंदोली येथील उसाने भरलेला ट्रॅक्टर अज्ञाताने पेटवून दिल्याने हे आंदोलन चिघळले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो यादव यांना या बाबत ताब्यात घेतले असल्याचे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान यामुळे कराड तालुक्यातील वातावरण तापले आहे.

Web Title: self-respecting sugarcane ban movement raged In Karhad in Satara, sugarcane tractor was set on fire in Indoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.