भारत हवामान विभागात आत्मनिर्भर - केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू 

By दीपक शिंदे | Published: October 5, 2023 07:33 PM2023-10-05T19:33:03+5:302023-10-05T19:33:35+5:30

महाबळेश्वरमधील ढग संशोधन केंद्रास भेट देऊन पाहणी

Self sufficient in India Meteorological Department says Union Earth Science Minister Kiren Rijiju | भारत हवामान विभागात आत्मनिर्भर - केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू 

भारत हवामान विभागात आत्मनिर्भर - केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू 

googlenewsNext

महाबळेश्वर : ‘हवामान संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करून चांगले यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीच्या जोरावर हवामान विभागात भारत आत्मनिर्भर झाला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे,’ अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

महाबळेश्वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. जी. पंडीथूरल उपस्थित होते. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू हे दोनदिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून, गुरुवारी त्यांनी महाबळेश्वर येथील हवामान विभागाच्या ढग संशोधन केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

मंत्री रिजिजू म्हणाले, ‘शास्त्रज्ञांनी हवामान संशोधनात केलेल्या कामामुळे देशातील मच्छिमार व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. पूर्वी ढगांच्या संशोधनासाठी विमानाची मदत घ्यावी लागत होती. परंतु, महाबळेश्वरला मिळालेल्या नैसर्गिक उंचीमुळे येथे ढग संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यासाठी आता विमानाची मदत घ्यावी लागत नाही. ढगफुटी, महापूर व दरड कोसळून होणाऱ्या आपत्तीची माहिती अगोदर मिळविण्यात अपयश येत आहे. भविष्यात या संदर्भात अधिकचे संशोधन करण्याची गरज आहे.
महाबळेश्वरला नैसर्गिक सुंदर असे दृष्टी सौंदर्य लाभले आहे. महाबळेश्वरला भेट देऊन चांगले वाटले.

लहानपणापासूनच महाबळेश्वरला यायची इच्छा होती. ‘अनुपमा’ नावाच्या जुन्या चित्रपटांमध्ये महाबळेश्वरच्या दऱ्याखोऱ्या सुंदररीत्या चित्रीत करण्यात आल्या आहेत. माझ्यासोबत अभिनेते धर्मेंद्र लोकसभेमध्ये होते. तेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे झाले? असे विचारले असता त्यांनी महाबळेश्वर सांगितले होते. महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयास येण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, चांगले कार्यक्रमांचे आयोजन येथे केले पाहिजे. देशातील अनेक पर्यटक देशाबाहेर पर्यटनास जातात; मात्र आपल्या देशातच अनेक सुंदर पर्यटनस्थळे असूनही प्रसिद्धीअभावी लोकांना याची माहिती मिळत नाही. या ठिकाणी येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करू.’

महाबळेश्वमधील विविध पॉईंटला भेट

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पहाटे महाबळेश्वरचे वैभव असलेले सूर्योदय, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध विल्सन पॉइंटसह श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, तसेच केट्स पॉइंटला भेट दिली. विविध रंगी फुलांची माहिती, तसेच या प्रेक्षणीय स्थळांवरील निसर्गसौंदर्याची अनुभूती घेतली.

Web Title: Self sufficient in India Meteorological Department says Union Earth Science Minister Kiren Rijiju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.