पुनर्वसनाचा प्रस्ताव तत्काळ पाठवा : शंभूराज देसाई

By दीपक देशमुख | Published: September 26, 2022 10:29 PM2022-09-26T22:29:14+5:302022-09-26T22:29:50+5:30

देसाई यांनी पालकमंत्री पदी नियुक्ती होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.

Send rehabilitation proposal immediately : Shambhuraj Desai | पुनर्वसनाचा प्रस्ताव तत्काळ पाठवा : शंभूराज देसाई

पुनर्वसनाचा प्रस्ताव तत्काळ पाठवा : शंभूराज देसाई

googlenewsNext

सातारा : सर्व विभाग प्रमुखांनी लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गतीने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी पाटण तालुक्यातील माथनेवाडी येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

देसाई यांनी पालकमंत्री पदी नियुक्ती होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलवडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील मातोश्री पाणंद रस्त्यांचा आढावा घेतला. २०२१-२२ मधील अपूर्ण कामे व २०२२-२३ मधील कामे कालमर्यादेत पूर्ण करा. पाणंद रस्ते तयार करीत असताना प्राधान्याने अतिक्रमणे काढा, अशा सूचनाही देसाई यांनी केल्या.उत्तर मांड प्रकल्पांतर्गत माथनेवाडी व महिंद्र प्रकल्पांतर्गत बोरगेवाडी गावाच्या पुनर्वसनाच्या अपूर्ण कामासंदर्भातही देसाई यांनी आढावा घेतला. माथनेवाडी येथील काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तत्काळ जलसंपदा विभागाकडे पाठविण्याच्या सूचनाही केल्या.
 

Web Title: Send rehabilitation proposal immediately : Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.