साताऱ्यातील सीमोल्लंघन सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 05:21 PM2020-10-26T17:21:04+5:302020-10-26T17:22:25+5:30
CoronaVirus, sataranews, dasra ऐतिहासिक शाहूनगरीतील दसऱ्याचा सोहळा हा अवर्णनीय असाच असतो. यंदा मात्र या सोहळ्याला ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला असून सातारकरांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
सातारा : ऐतिहासिक शाहूनगरीतील दसऱ्याचा सोहळा हा अवर्णनीय असाच असतो. यंदा मात्र या सोहळ्याला ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला असून सातारकरांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर ऐतिहासिक सातारा शहरातील सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच सातारा शहरातील सर्व नागरिक परंपरेनुसार जलमंदिर येथील देवीच्या दर्शनासाठी व खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी जातात.
यावर्षी हे सर्वच कार्यक्रम कौटुंबिक स्वरुपात करण्यात येणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कळविले आहे, त्यामुळे कृपया कोणीही जलमंदिर याठिकाणी सोन्याची पाने देण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.