मसूरला स्वतंत्र ५० बेडचे विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:19+5:302021-05-25T04:43:19+5:30
मसूर : मसूर (ता. कऱ्हाड) येथे स्त्री व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र ५० बेडचे विलगीकरण कक्ष दोनच ...
मसूर : मसूर (ता. कऱ्हाड) येथे स्त्री व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र ५० बेडचे विलगीकरण कक्ष दोनच दिवसात कार्यान्वित करण्यात येणार असून, यापुढे पॉझिटिव्ह रुग्णाला विलगीकरण कक्षातच राहावे लागणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची साखळी तुटण्यास मदत होणार आहे.
मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून प्रशासनाने तातडीची बैठक घेतली. या बैठकीस तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, उंब्रज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सरपंच पंकज दीक्षित व पदाधिकारी उपस्थित होते.
मसूर येथे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांमार्फत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीवेळी सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी मसूर-उंब्रज रस्त्यालगत असलेल्या त्रिमूर्ती मंगल कार्यालयाचे मालक प्रवीण लोकरे यांच्याशी संवाद साधून, आयसोलेशन सेंटरसाठी कार्यालय देण्याची मागणी केली असता, लोकरे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मागणी मान्य केली.
सभापती मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेतून काही मदत मिळत असल्यास त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.’
कोट..
मसूरमध्ये २५ पेक्षा जास्त खासगी डॉक्टर्स कार्यरत आहेत. या महामारीच्या काळात त्यांना समाजकार्य करण्याची संधी आली आहे. त्यांना या विलगीकरण कक्षातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी विनंती करणार आहे.
-
- डॉ. रमेश लोखंडे,
वैद्यकीय अधिकारी
(कोट)
मसूर ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली सुरू होत असलेल्या या विलगीकरण कक्षातील रुग्णांची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
- पंकज दीक्षित,
सरपंच, मसूर
२४मसूर
फोटो कॅप्शन :
मसूर येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करताना तहसीलदार अमरदीप वाकडे, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे स.पो.नि. अजय गोरड, डॉ. रमेश लोखंडे, सरपंच पंकज दीक्षित, उपनिरीक्षक प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.