विलगीकरण कक्ष संजीवनी ठरतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:12+5:302021-06-11T04:26:12+5:30
मारूल हवेली, ता. पाटण येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या तीस बेडच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ...
मारूल हवेली, ता. पाटण येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या तीस बेडच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, राजाभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार पाटील म्हणाले, घरातील विलगीकरणामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. तेथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यास अनुसरून येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. तसेच इतर अनेक गावांमध्येही ग्रामपंचायत व लोकसहभागातून उभारत असलेले विलगीकरण कक्ष गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी व शासनाच्या प्रयत्नांना यश यावे, यासाठी गावपातळीवर विलगीकरण कक्षात रुग्णांनी स्वत:हून दाखल व्हावे, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
यावेळी सारंग पाटील, श्रीरंग तांबे यांचेही भाषण झाले. नितीन शिंदे यांनी स्वागत केले. राजेंद्र नांगरे यांनी आभार मानले.
फोटो : १०केआरडी०३
कॅप्शन : मारूल हवेली, ता. पाटण येथे विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार श्रीनिवास पाटील.