किडगाव येथे विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:23+5:302021-05-30T04:30:23+5:30
किडगाव : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावामध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. ...
किडगाव : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावामध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार किडगाव (ता. सातारा) येथील ग्रामपंचायत व गावातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने भैरवनाथ विद्यालय, नेले किडगाव या शाळेत वीस बेडच्या विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.
साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांनी या विलगीकरण कक्षाच्या निर्मितीसाठी ग्रामपंचायतीला आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन धावडशी उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली पाटील तसेच सरपंच शुभांगी चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत इंगवले, इंद्रजित ढेंबरे, डॉ. चंद्रहर पवार, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नंदकुमार इंगवले, माजी सरपंच राजेंद्र शेडगे, शंकर टिळेकर, विठ्ठल इंगवले, विश्वास शिंदे तसेच आरोग्यसेवक संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष इंगवले, संतोष टिळेकर, सोनाली पवार, शुभांगी इंगवले, भानुदास चतुर, संतोष शिंदे, आदम पठाण, सचिन पाटील, किरण पवार, नीलेश चोरगे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सेवक, शशिकांत शिंदे, दादा लोहार, आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.