सैदापूर येथे विलागीकरण कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:59+5:302021-05-31T04:27:59+5:30

ओगलेवाडी : सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे सद‌्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कऱ्हाड व ग्रामपंचायत, सैदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सद‌्गुरू गाडगे ...

Separation room started at Saidapur | सैदापूर येथे विलागीकरण कक्ष सुरू

सैदापूर येथे विलागीकरण कक्ष सुरू

Next

ओगलेवाडी : सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे सद‌्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कऱ्हाड व ग्रामपंचायत, सैदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सद‌्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. या विलगीकरण कक्षाचा प्रारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सरपंच फत्तेसिंह जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, ॲड. रवींद्र पवार, उपसरपंच अनिल जाधव, तलाठी लालासाहेब साळुंखे, ग्रामसेवक एस.डी. निंबाळकर, पोलीसपाटील संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

‘गृहविलगीकरणामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी विलगीकरण कक्षाची फारच अवश्यकता आहे म्हणून प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष स्थापन झाल्यास गावातील सर्व रुग्णांना एकाच ठिकाणी उपचार व सेवा देण्याबरोबरच त्याच्यावर लक्ष ठेवणे सोयीचे होईल, यासाठी प्रत्येक गावात विलगीकरण कक्षाची आवश्यकता निर्माण झाली आहे,’ असेही यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Web Title: Separation room started at Saidapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.