तांबवेत वीस बेडचा विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:47+5:302021-05-31T04:27:47+5:30

तांबवे : येथील ग्रामपंचायतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विलगीकरण कक्ष उभारला आहे. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता ...

Separation room of twenty beds in copper | तांबवेत वीस बेडचा विलगीकरण कक्ष

तांबवेत वीस बेडचा विलगीकरण कक्ष

googlenewsNext

तांबवे : येथील ग्रामपंचायतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विलगीकरण कक्ष उभारला आहे. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेतील तीन खोल्यांमध्ये वीस बेडचा कक्ष सुरू केला आहे.

या विलगीकरण कक्षासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेऊन परिसर स्वच्छता तसेच साहित्याची उपलब्धता करण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विलगीकरण कक्षाच्या मदतीसाठी ३ हजार ५०० रुपयांची देणगी सरपंच शोभाताई शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली आहे तर पोपटराव पाटील यांनी कक्षाला साहित्याची मदत केली आहे. शहीद जवान युवराज पाटील प्रतिष्ठानकडून कोरोना रूग्णांसाठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच अ‍ॅड. विजयसिंह पाटील, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, तलाठी ढवणे, पोलीसपाटील पवन गुरव, मुख्याध्यापिका नलवडे, सतीश पाटील, यशवंत पाटील, काकासाहेब पाटील, वैभव शिंदे, अशरफ मुल्ला, समीर नदाफ उपस्थित होते.

फोटो : ३० केआरडी ०२

कॅप्शन : तांबवे (ता. कऱ्हाड) येथे वीस बेडचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, शोभाताई शिंदे, विजयसिंह पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Separation room of twenty beds in copper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.