कोरोना रोखण्यासाठी विलगीकरण कक्ष गावोगावी व्हावेत : संजीवराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:38 AM2021-05-10T04:38:36+5:302021-05-10T04:38:36+5:30

वाठार निंबाळकर येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या विलगीकरण कक्षाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच शारदा भोईटे, नंदूभाऊ नाळे, राजीव ...

Separation rooms should be set up in villages to prevent corona: Sanjeev Raje | कोरोना रोखण्यासाठी विलगीकरण कक्ष गावोगावी व्हावेत : संजीवराजे

कोरोना रोखण्यासाठी विलगीकरण कक्ष गावोगावी व्हावेत : संजीवराजे

Next

वाठार निंबाळकर येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या विलगीकरण कक्षाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच शारदा भोईटे, नंदूभाऊ नाळे, राजीव नाईक-निंबाळकर, प्रकाश तरटे, अमर नाईक-निंबाळकर, लालासाहेब भडलकर, सुनील घोलप, शेखर निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब सपकळ, तलाठी संतोष नाबर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या या कक्षासाठी उद्योजक सत्यजित नाईक-निंबाळकर व कमिन्स कंपनी यांच्या आर्थिक मदतीतून, तसेच गावातील लोकसहभागातून ४५ बेडचा विलगीकरण कक्ष स्थापन झाला. या कक्षासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदूभाऊ नाळे यांनी दोन ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच गावातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी ७५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

विलगीकरण कक्षासाठी डॉक्टर, नर्स, तसेच उपस्थित पेशंटसाठी औषध व नाश्त्याची सोय वाठार येथील तरुण मंडळींनी केली आहे. डॉ. नितीन राठोड, तसेच गावामध्ये कार्यरत असलेले डॉ. अनिकेत जगदाळे, रवींद्र बिचुकले, नेताजी निंबाळकर रुग्णांना सेवा देणार आहेत, गावातील तरुण वर्ग, सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून प्रत्येक वर्गामध्ये फॅन, तसेच जनरेटर सुविधा, स्वच्छतागृहाची सुविधा, तसेच पाणी फिल्टर सुविधाही करण्यात आली आहे.

Web Title: Separation rooms should be set up in villages to prevent corona: Sanjeev Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.