जिल्ह्यातील साडेसात लाख लोकांना मिळाला कोरोना लसीचा पहिला डोस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:24 AM2021-07-09T04:24:56+5:302021-07-09T04:24:56+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण पाच महिन्यांपासून सुरू असले तरी मोठ्या प्रमाणात लस मिळत नसल्याने मोहीम संथगतीने सुरू आहे. ...

Seven and a half lakh people in the district got the first dose of Corona vaccine ... | जिल्ह्यातील साडेसात लाख लोकांना मिळाला कोरोना लसीचा पहिला डोस...

जिल्ह्यातील साडेसात लाख लोकांना मिळाला कोरोना लसीचा पहिला डोस...

Next

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण पाच महिन्यांपासून सुरू असले तरी मोठ्या प्रमाणात लस मिळत नसल्याने मोहीम संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत साडेसात लाखांहून अधिक नागरिकांना पहिला तर १ लाख ८९ हजारांवर लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. १८ वर्षांपुढील लसीकरणाची टक्केवारी ३६ टक्के इतकी आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ६० वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि काही खासगी रुग्णालयांत ही सुविधा सुरु झाली. शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.

दिनांक १ मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, ही लसीकरण मोहीम बारगळली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. त्याचबरोबर सव्वानऊ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी आहेत.

जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४००हून अधिक केंद्रांत सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. याठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रच सुरू असतात. आतापर्यंत जिल्ह्याला ९ लाख ५१ हजार ९५० कोरोना लसीचे डोस मिळालेले आहेत. त्यातील पहिला डोस ७ लाख ५६ हजार ९२२ नागरिकांना देण्यात आला आहे.

पॉईंटर :

- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले कोरोना लसीच डोस ९,५१,९५०

- लसीकरण झाले ९,४५,९९७

६० वर्षांवरील नागरिक

- प्रथम डोस २,९२,७४७

- दुसरा डोस ७८,०२९

४५ ते ६० वयोगट

- पहिला डोस २,९७,५१४

- दुसरा डोस ५८,६२९

१८ ते ४५ वयोगट

- पहिला डोस ८२,३८१

- दुसरा डोस ७,२९७

...............................................................

Web Title: Seven and a half lakh people in the district got the first dose of Corona vaccine ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.