बैलगाडी शर्यतीप्रकरणी सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:23+5:302021-07-28T04:41:23+5:30

कोरेगाव : तालुक्यातील चिमणगावानजीक असलेल्या बोरजाईवाडीत डोंगर उतारावर भरविण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीवर कोरेगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. शर्यतीचे ...

Seven charged in bullock cart race | बैलगाडी शर्यतीप्रकरणी सात जणांवर गुन्हा

बैलगाडी शर्यतीप्रकरणी सात जणांवर गुन्हा

Next

कोरेगाव : तालुक्यातील चिमणगावानजीक असलेल्या बोरजाईवाडीत डोंगर उतारावर भरविण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीवर कोरेगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चार पिकअप जीपसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक उपनिरीक्षक केशव फरांदे, जवान किशोर भोसले, प्रमोद जाधव व गृहरक्षक दलाचे जवान केतन शेडगे यांनी मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बोरजाईवाडीत जाऊन केली.

कारवाईत सहा लाख रुपये किमतीच्या चार पिकअप जीप जप्त केल्या. रमेश तुकाराम कदम, प्रकाश दुर्योधन कदम (दोघेही रा. चंचळी), मुसा अस्लम सय्यद (रा. अपशिंगे, सातारा), बलराम सुदाम चव्हाण (रा. सहकारनगर-संगमनगर, सातारा), सूर्यकांत हणमंत मच्छिंद्र, अविनाश अशोक घाडगे, नाना बाळू माने (तिघे रा. ल्हासुर्णे) यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस जवान किशोर भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Seven charged in bullock cart race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.