पुण्याकडे जाणाºया ‘हायवे’वर सात किलोमीटरच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:46 PM2017-10-22T23:46:41+5:302017-10-22T23:46:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : एसटी कर्मचाºयांच्या संप कालावधीत कसेबसे गावी आलेल्या चाकरमान्यांना परत जातानाही वाहतुकीच्या कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याकडे जाणाºया पुणे-बेंगलोर हायवेवर सुमारे सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यास्तव अनेकांना ताटकळत राहावे लागले.
दिवाळीची सुटी संपवून चाकरमनी पुणे, मुंबईला रविवारी निघाले होते. सोमवारी कामावर हजर राहण्यासाठी अनेकजण रविवारी सकाळीच घरातून बाहेर पडले. परंतु महामार्गावर सहा ते सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने अनेक प्रवासी अडकून राहिले. पुणे आणि कोल्हापूर बाजूकडून वाहतूक ठप्प झाली होती. खेड ते लिंबखिंड परिसरापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सातारा शहरातून वाहतूक वळविण्यात आली होती. तर फलटण रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यावरूनही वाहने सोडण्यात येत होती. कुठेतरी अपघात झाला असेल, असे प्रवाशांना वाटत होते. मात्र पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर असा कोणताही अपघात झाला नसल्याचे सांगण्यात आले. दिवाळीची सुटी संपवून चाकरमनी रविवारी एकाचवेळी निघाल्याने ही परिस्थिती झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सातारा बसस्थानकातही हीच परिस्थिती होती. पुणे विनाथांबा जाणाºया प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रखरखत्या उन्हातही प्रवासी रांगेमध्ये उभे राहिले होते. रात्री उशिरापर्यंत बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होती.