गौणखनिज उत्खनन अन् वाहतूकप्रकरणी सात लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 08:25 PM2019-12-12T20:25:01+5:302019-12-12T20:26:34+5:30
तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ किसन जाधव (रा. भाडळी बुद्रुक) याच्याविरुद्ध ट्रक (एमएच ११ सीएच ५५५०) मधून गौणखनिजाची वाहतूक केल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
फलटण : फलटण तालुक्यात विनापरवाना गौणखनिज उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदार हनुमंत पाटील व महसूल विभागाने डिसेंबरच्या प्रारंभीच गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. या कारवाईत तब्बल सात लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ किसन जाधव (रा. भाडळी बुद्रुक) याच्याविरुद्ध ट्रक (एमएच ११ सीएच ५५५०) मधून गौणखनिजाची वाहतूक केल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गणपत मुगुट सावंत (रा. पिराचीवाडी) याने एक ब्रास वाळू उत्खनन केल्याच्या आरोपावरून त्यांच्याकडून ३० हजार ८६९ रुपये, नामदेव दादा होळकर (रा. रावडी खुर्द) याच्याकडून ८ ब्रास वाळू उत्खननप्रकरणी २ लाख ५० हजार रुपये, तुकाराम शंकर होळकर (रा. रावडी खुर्द) यांच्याकडूनअर्धा ब्रास वाळू ट्रॅक्टर (एमएच ११ ६३१८) मधून वाहतूक केल्याच्या आरोपावरून त्यांच्याकडून १ लाख १५ हजार ४४० रुपये, बाळू किसन होळकर (रा. रावडी खुर्द) याने अर्धा ब्रास वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्याकडून १ लाख १५ हजार ४४० रुपये, नामदेव दादा होळकर (रा. रावडी खुर्द) याने ट्रक (एमएच ४२ एम ९८४८) मधून एक ब्रास वाळू वाहतूक केल्याच्या आरोपावरून त्याच्याकडून २ लाख ३० हजार ८६९ रुपये असा ७ लाख ४२ हजारांवर दंड वसूल केला आहे.