विनयभंग व मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:40+5:302021-05-12T04:40:40+5:30
वडूज : खटाव तालुक्यातील एका गावामध्ये पत्नीचा विनयभंग करून पतीस सात जणांनी मारहाण करून खिशातील पाच ...
वडूज : खटाव तालुक्यातील एका गावामध्ये पत्नीचा विनयभंग करून पतीस सात जणांनी मारहाण करून खिशातील पाच हजार रुपये जोरजबरदस्तीने चोरून नेल्या प्रकरणी सात जणांवर मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, रविवार, ९ मे रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमाराला गावाबाहेरील शेतात पत्नीसह पती आल्यातील गवत काढीत होते. त्या दरम्यान ३० ते ४५ वयोगटातील अनोळखी इसम तोंडाला कापड बांधून आले. पीडितेच्या पतीस तुला वारंवार पैसे मागूनही तू पैसे देत नाहीस, असे म्हणून त्यांच्यातील महादेव सत्याप्या बनसोडे व रामा बनसोडे यांनी हाताने मारहाण केली तर महादेव सत्याप्पा बनसोडे यांनी वाईट भावनेने व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, अशी तक्रार पीडित महिलेने वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून, तपास पोलीस हवालदार शांतीलाल ओंबासे करीत आहेत.