धारपुडी डेअरीत सोयाबीनपासून दूध सातजण ताब्यात : पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक माहिती उघड; सव्वा लाखांचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:27 AM2017-12-26T01:27:09+5:302017-12-26T01:28:00+5:30
पुसेगाव : धारपुडी, ता. खटाव येथील जय मिल्क डेअरीवर कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी छापा टाकून
पुसेगाव : धारपुडी, ता. खटाव येथील जय मिल्क डेअरीवर कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी छापा टाकून दुधामध्ये बेकायदेशीर भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी १८५ किलो पावडर जप्त केली. तसेच भेसळ करणाºया व्यक्तींना अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवारईत ४ हजार ३०० लिटर गायीचे दूध, ३८ लिटर सोयाबीन तेल, १५८ किलो कोरडी पावडर असा सुमारे १ लाख १६ हजार ५३४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच भेसळयुक्त दूध जागीच ओतून नष्ट करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धारपुडी (ता. खटाव) येथील जय मिल्क डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून या डेअरीवर पाळत ठेवण्यातआली होती.
त्यानुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने संबंधित डेअरीवर छापा टाकला. त्यावेळी दूध पावडरची ६ खोकी त्यात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी १८५ किलो पावडर ताब्यात घेण्यात आली.
याबाबत डेअरीचे मालक तुकाराम यादव व मॅनेजर मनीष नारायण जगताप यांच्याकडे
विचारणा केली असता त्यांनी भुरकवडी येथील दत्ता चव्हाण हे पावडर पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दत्ता चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी येरळवाडी येथील पृथ्वीराज मिल्क या डेअरीलासुद्धा १ गाडीपावडर पुरवल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी येरळवाडी येथे जाऊन तपासणी केली असता तेथील पृथ्वीराज मिल्क या डेअरीत काहीही सापडले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, भेसळ करण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ व संबंधित व्यक्तींना अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. यात अश्विन भगवान बोटे, चौरंग
दिनकर बोटे (रा. दरजाई), रणजित जगन्नाथ माळी (रा. खटाव)
शरद केशव गायकवाड (रा. खटाव), मनिष नारायण जगताप (रा. धारपुडी), विरू ऊर्फ पिंटू जयसिंग पाटोळे(रा. दरजाई) व तमन्ना इबने हुसेन रजवे (रा. धारपुडी) यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे दूध डेअरी मालकांचे धाबे दणाणले आहेत.
भेसळ करणाºयांवर कठोर कारवाई
दुधात भेसळ होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर धारपुडी येथील दूूध डेअरीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे सवा लाखांचे साहित्य जप्त केले असून भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. अन्न औषध विभागाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दूधात अशा प्रकारे भेसळ करणाºयांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी दिला आहे.