राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी साताºयातील सात खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:33 PM2018-10-02T13:33:05+5:302018-10-02T13:34:05+5:30
सातारा: गोंदिया येथे २१ व्या महाराष्ट्र स्टेट मास्टर अॅक्वास्टिक चॅम्पियनशीप जलतरण स्पर्धेत साताºयाच्या खेळाडूंनी यश मिळविले असून, सात खेळाडूंची हैद्राबाद येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांतील ५१० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वडूथ, ता. सातारा येथील बहुसंख्य खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये श्रीमंत गायकवाड यांनी २० मीटर आयएममध्ये गोल्ड, फ्री स्टाईलमध्ये सिल्व्हर, १०० मीटर बटरफ्लाय, सिल्व्हर, ४००, २०० मीटर फ्री ब्रॉंझ, माधव साबळे यांनी ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड, ५० मीटर बेस्टमध्ये सिल्व्हर, संजय भिलारे यांनी ५० मीटर फ्री स्टाईल सिल्व्हर, १०० मीटर फ्री स्टाईल ब्राँझ, विजय साबळे यांनी ५० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर बॅक स्ट्रोक, ५० मीटर ब्रेस्टमध्ये सिल्व्हर, ५० मीटर फ्रीमध्ये ब्राँझ मेडल पटकावले.
तसेच वसंत साबळे यांनी १०० मीटर बटरफ्लायमध्ये गोल्ड व ४ बाय ५० मध्ये ब्राँझ, जयसिंग साबळे व मयूर साबळे यांनी अनुक्रमे ४ बाय ५० मध्ये ब्राँझ मेडल पटकावले.श्रीरंग माने, प्रा. रवींद्र साबळे, प्राचार्य आबासाहेब बागल, मच्छिंद्र साबळे, राम मोरे, नंदकुमार साबळे, अनिकेत साबळे, संजय इथापे, आर. पी. साबळे, रमेश बोडके यांनीही या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
दरम्यान, या स्पर्धेतून हैद्राबाद येथे २६ आॅक्टोबरला होणाºया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी श्रीमंत गायकवाड, माधव साबळे, विजय साबळे, वसंत साबळे, संजय भिलारे, जयसिंग साबळे, मयूर साबळे यांची निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश कदम, भगवान चोरगे, सुधीर चोरगे, वडूथ गावचे सरपंच, उपसरपंचांनी कौतुक केले.