आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:02+5:302021-04-23T04:42:02+5:30

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सहा व्यावसायिकांवर तर बोरगाव ...

Seven traders have been charged with violating the order | आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

Next

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सहा व्यावसायिकांवर तर बोरगाव पोलिसांनी एका व्यावसायिकावर कारवाई केली आहे.

याबाबत माहिती अशी, अमरलक्षी, सातारा येथे जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून मोमीन चिकन सेंटर अँड एग्ज ही आस्थापना दि. २२ रोजी सायंकाळी ५.२०पर्यंत सुरू असल्याचे आढळून आले. याप्रकरणी महंमद दस्तगिर शेख (वय १८, रा. धनगरवाडी, ता. सातारा) याच्यावर साथरोग प्रतिबंधक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार कारळे हे करत आहेत.

देगाव फाटा येथे सुभाष गंगाराम जांभळे (वय ६६) यांनी त्यांचे रॉयल जेन्टस् पार्लर सुरू ठेवल्याचे शहर पोलिसांना आढळून आले. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर देगाव फाटा येथीलच भंडारी हाईटस् येथील दिनेश उत्तम रणसिंग (वय ४५) यांनी माऊली किराणा स्टोअर्स रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवल्याचे दिसून आले. प्रशासनाने वेळ ठरवून दिलेली असूनही नियम मोडल्याबद्दल त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अहिरे कॉलनी, सातारा येथील किराणा दुकान रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी लक्ष्मण आकाराम जाधव (वय ५५, रा. करंडी, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

राधिका रोडवरील गंमत जंमत वाईन शॉपमधून घरपोच दारू पोहोच न करता दुकानाचे शटर अर्धे उघडे ठेवून जाग्यावरच दारू विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस नाईक राहुल खाडे यांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रदीप श्रीरंग मोरे (रा. आंबेदरे, ता. सातारा) याच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन एमआयडीसी येथील झेंडा चौकात गुरुकृपा टायर वर्क्स सुरू ठेवल्याचे आढळून आले. जिल्हाधिकार्‍यांचा आदेश मोडल्याप्रकरणी प्रीतम संतोष बर्गे (रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय (अतित, ता. सातारा) येथील श्री दत्त एजन्सी हे किराणा दुकान ११ वाजून गेले तरी उघडे असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Seven traders have been charged with violating the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.