मंदी असतानही त्यांनी का उधळल्या नोटा- जाणून घ्या खरे कारण, व्हिडिओही केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:04 AM2020-04-17T11:04:39+5:302020-04-17T11:14:37+5:30
लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून रहिमतपूर पोलिसांनी त्यांच्यावरील खटला कोरेगाव न्यायालयात पाठवला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ करत आहेत.
रहिमतपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोबाईलवर गाणी लावून नाचत पैसे उधळत व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अपशिंगे, ता. कोरेगाव येथील सात युवकांवर रहिमतपूर पोलीसांनी कारवाई केली.
रोहित सूर्यकांत आगेडकर (वय २१), अभिजित विजय कदम (१८), सुयोग यशवंत कदम (१८), सूरज शिवाजी कदम (२३), विवेक विश्वनाथ खंडाईत (२०) यासह एक अल्पवयीन अशी कारवाई करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे येथे गुरुवार,दि. १६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सात युवक एकत्र येऊन मोबाईलवर तमाशातील लावणी लावून त्या गाण्यावर पैसे उधळत नाचत असल्याचा टिकटॉक व्हिडिओ तयार करत असताना सापडली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला असतानाही त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून एकत्र येऊन नाचून युवकांनी इतर लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून रहिमतपूर पोलिसांनी त्यांच्यावरील खटला कोरेगाव न्यायालयात पाठवला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ करत आहेत.