कोविड तपासणी करायला सतराशे विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:36 AM2021-04-03T04:36:09+5:302021-04-03T04:36:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड असल्याची तपासणी कमीत कमी त्रासात करण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. शहरात तीन ठिकाणी ...

Seventeen hundred obstacles to Kovid investigation! | कोविड तपासणी करायला सतराशे विघ्न!

कोविड तपासणी करायला सतराशे विघ्न!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविड असल्याची तपासणी कमीत कमी त्रासात करण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. शहरात तीन ठिकाणी तपासणीची सोय असताना कोणाकडे मनुष्यबळ नाही म्हणून, तर कोणाकडे तपासणीचे कीट उपलब्ध नाही तर कुठे दाखल झाल्याशिवाय तपासणीच करणार नसल्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे संसर्गित व्यक्ती समाजात सहज मिसळत असून तपासणीला विलंब लागत असल्याने संसर्गितांची संख्याही वाढू लागली आहे.

पुणे-मुंबई या महानगरांप्रमाणेच साताऱ्यातही संसर्गितांचा रोजचा आकडा मोठा दिसतोय. पुणे-मुंबईबरोबर हे साताऱ्याच्या कनेक्शनचा एक भाग आहेच. मोठ्या शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच त्याची साखळी तोडणे हा प्रशासकीय यंत्रणेसमोरचा सर्वाधिक मोठा प्रश्‍न आहे. गेल्या काही दिवसांत साताऱ्यातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. पुणे, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच तेथून पुन्हा साताऱ्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ही वाढ साताऱ्याच्या कोरोनाच्या आकड्यात भर टाकणारी आहे.

सातारा शहरात कस्तुरबा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि गोडोलीतील रुग्णालयात तपासणी करणे शक्य होते. मात्र, कस्तुरबा रुग्णालयात तपासणी कीट संपल्याने दोन दिवस तपासणी होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात ११ वाजेनंतर केसपेपर काढून देत नसल्याने ही तपासणी करणे सामान्यांना मुश्कील होते. तर शहराच्या एका टोकापासून गोडोलीत जाऊन पुन्हा तोच अनुभव घेण्यापेक्षा संशयित संसर्गित पुन्हा समाजात, कुटुंबात मिसळून संख्या वाढविण्यासाठी हातभार लावत आहे. जम्बो कोविड रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतरच तपासणी करण्याचा फंडा असल्यामुळे त्याचाही सामान्यांना फटका बसत आहे. गावाकडून एसटीतून उतरून थेट या कोविड रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, पण तिकडेही कायद्यावर बोट दाखवले जात असल्याने सामान्यांची फरफट होत आहे.

चौकट :

कोरोना संसर्गित असल्याची तपासणी करण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. शासनाच्या सिस्टमला ही नोंद झाली असेल तर जम्बो कोविडसह जिल्हा रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात पुन्हा कागदपत्रांची पूर्तता करणे रुग्णांना त्रासाचे होत आहे. संसर्गित असलेला व्यक्ती जिथे येईल तिथे त्याची तपासणी करण्याची व्यवस्था उपलब्ध असली तर ती व्यक्ती कुठेही अन्यत्र भटकत बसणार नाही. सकाळी १० ते ६ येणाऱ्या प्रत्येकाची विनाब्रेक टेस्टिंग केले गेले तर हे लोक समूहात मिसळून संसर्ग वाढविण्याचा धोका टाळू शकतात.

कोट :

शासकीय यंत्रणांवरील ताण आणि त्यांना पाळावा लागत असलेला प्रोटोकॉल याचा विचार करता ही यंत्रणा निर्दोष म्हणावी लागेल. सलग आलेल्या सुट्या आणि वाढता ताण यामुळे काही ठिकाणी तपासणी कीट नसणे हे होऊ शकते. ही सुविधा उपलब्ध करून यंत्रणा पुन्हा पूर्ववत होईल, यात शंका नाही.

-विनीत पाटील, कोविड डिफेंडर ग्रुप, सातारा

Web Title: Seventeen hundred obstacles to Kovid investigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.