कोयना धरणात सतरा वर्षांतील निच्चांकी पाणीसाठा; वीजनिर्मिती ठप्प; सिंचनाचा प्रश्नही गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:30 AM2023-06-24T11:30:44+5:302023-06-24T11:31:35+5:30

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट

Seventeen year low water storage in Koyna Dam; Power generation stopped | कोयना धरणात सतरा वर्षांतील निच्चांकी पाणीसाठा; वीजनिर्मिती ठप्प; सिंचनाचा प्रश्नही गंभीर

कोयना धरणात सतरा वर्षांतील निच्चांकी पाणीसाठा; वीजनिर्मिती ठप्प; सिंचनाचा प्रश्नही गंभीर

googlenewsNext

नीलेश साळुंखे

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातपाणीसाठा सध्या १०.७१ टीएमसी आहे. मृत पाणीसाठा वगळता धरणात केवळ ५.५९ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गत सतरा वर्षांतील हा निच्चांकी साठा आहे. यापूर्वी १८ जून १९९६ ला धरणातील पाणीसाठा १०.६६ टीएमसी इतका होता.

सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे आटलेले ओढे, नाले प्रवाहित झालेच नाहीत. धरणेही कोरडी पडल्याने नद्याही आटू लागल्या आहेत. कोयना धरणाच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे विदारक स्थिती निर्माण झाली आहे. अपेक्षित पाऊस पडला नसल्याने धरणात गत बारा वर्षांतील निच्चांकी पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी वीजनिर्मिती थांबली आहे. सिंचनासाठीही मर्यादा आल्या आहेत.

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर अल्पावधीतच निच्चांकी पाणीसाठ्याची नोंद होऊ शकते. यापूर्वी २०१९ मध्ये धरणातील पाणीसाठा १०.७३ टीएमसी एवढा निच्चांकी नोंदला गेला होता. शुक्रवार सायंकाळी कोयना धरणातील पाणीसाठा १०.७१ टीएमसी इतका शिल्लक आहे.

कोयना धरणाच्या निर्मितीनंतर १८ जून १९९६ रोजी पाणीसाठा १०.६६ टीएमसी होता. हा निच्चांकी पाणीसाठा असून, त्यावेळी धरणाची साठवण क्षमता ९८.५ टीएमसी होती. साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी वाढविल्यानंतर शुक्रवारचा १०.७१ टीएमसी हा निच्चांकी पाणीसाठा आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा हा १५ जुलैपर्यंत पुरेसा आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता आशिष जाधव यांनी दिली.

यापूर्वीचा पाणीसाठा

दिनांक : पाणीसाठा टीएमसीत
१० जून २०११ : ३०.९३
३ जुलै २०१२ : २६.६६
९ जून २०१३ : ३१.४१
११ जुलै २०१४ : १२.५५
१९ जुलै २०१५ : २९.७१
२९ जून २०१६ : १२.१८
२२ जून २०१७ : १६.३०
२३ जून २०१८ : २५.६६
२७ जून २०१९ : १०.७३
४ जुलै २०२० : ३१.९४
६ जून २०२१ : २७.८८
१ जुलै २०२२ : १३.५५
२३ जून २०२३ : १०.७१

इतर पंधरा धरणांत केवळ ११.७७ टीएमसी पाणीसाठा
धरणाचा पाणीसाठा कंसात क्षमता
मोठे प्रकल्प

धोम १.९४ (१३.५०)
धोम बलकवडी ०.६६ (४.०८)
कण्हेर १.२१ (१०.१०)
उरमोडी २.८६ (९.९६)
तारळी २.९२ (५.८५)
मध्यम प्रकल्प
येरळवाडी ०.०९ (१.१५)
नेर ०.१५ (०.४२)
रानंद ०.०५ (०.२५)
आंधळी ०.०४ (०.३३)
नागेवाडी ०.०६ (०.२३)
मोरणा ०.४५ (१.३९)
उत्तरमांड ०.७४ (०.८८)
महू ०.७४ (१.१०)
हातगेघर ०.०२ (०.२६)
वांग ०.३२ (२.७३)

Web Title: Seventeen year low water storage in Koyna Dam; Power generation stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.