हिंगणगावच्या रोपवाटिकेत सत्तर हजार रोपे सज्ज!
By admin | Published: June 21, 2017 03:10 PM2017-06-21T15:10:22+5:302017-06-21T15:10:22+5:30
फलटण तालुका वन अधिकाऱ्याची माहिती : वनक्षेत्रात लागवड करणार
आॅनलाईन लोकमत
आदर्की, दि. २१ : हिंगणगाव, ता. फलटण येथील वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये लिंब, वारळा, खैर, टॉयटॉलीस, बाभूळ, करंज, शिसू आदी सत्तर हजार रोपे लागवडीसाठी तयार असल्याचे माहिती तालुका वनअधिकारी एस. आर. घाडगे यांनी दिली.
घाडगे म्हणाले, ह्यहिंगणगाव रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करताना शेणखत व काळ्या मातीची पाच किलो पिशिवी भरून बी टोकून केल्याने रोपांची वाढ चांगली झाली आहे व वातावरणात बदल झाल्याने रोपावर परिणाम होऊ नये म्हणून औषधांची फवारणी केली आहे.
रोपांच्या वाढीसाठी शेणखताबरोबर रासायनिक खतांचा वापर केल्याने रोपांची वाढ चांगली झाली आहे. सत्तर हजार रोपे लागवडीसाठी तयार झाल्याने वनविभागाच्या वनक्षेत्रात रोपाची लागण करण्यात सुरुवात केली आहे."