दोन तासात सत्तर ग्रामस्थांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:32+5:302021-04-12T04:36:32+5:30
मसूर आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या शामगाव आरोग्य उपकेंद्रात दर शनिवारी लसीकरणाचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीत नावनोंदणी ...
मसूर आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या शामगाव आरोग्य उपकेंद्रात दर शनिवारी लसीकरणाचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीत नावनोंदणी करण्यात येते. पहिल्याच आठवड्यात सुमारे तीनशे ग्रामस्थांनी आपली नावनोंदणी केली. शनिवारी आरोग्य विभागाचे कर्मचारी हजर झाले; मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण रद्द करण्यात आले होते. ग्रामस्थ आरोग्य उपकेंद्राकडे घिरट्या घालत होते. अखेर दुपारी तीन वाजता लस उपलब्ध झाली. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. फक्त दोन तासात सत्तर ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले.
मसूर आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, आरोग्यसेवक अरुण साळुंखे, आरोग्यसेविका जे. एच. जाधव, सरपंच शीतल गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब पोळ, भीमराव डांगे, सुनील गायकवाड, महेंद्र जाधव, सुनील पोळ, आशासेविका, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : ११केआरडी०२
कॅप्शन : शामगाव, ता. कऱ्हाड येथे सरपंच शीतल गायकवाड, डॉ. रमेश लोखंडे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.