साताऱ्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरण ५० टक्के भरले, साठा ५३ टीमएसीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:54 PM2018-07-12T13:54:57+5:302018-07-12T14:00:29+5:30
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ५३.३० टीमएसी इतका साठा झाला असून, धरण ५० टक्के भरले आहे. तर नवजा येथे १३० आणि महाबळेश्वरला १३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ५३.३० टीमएसी इतका साठा झाला असून, धरण ५० टक्के भरले आहे. तर नवजा येथे १३० आणि महाबळेश्वरला १३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
गेल्या ११ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तर भात लागणीच्या कामाला वेग आला आहे.
बुधवारी रात्रीपासून तर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ५३.३० टीएमसी पाणीसाठा झाला असून, ३३ हजार ४९० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.
यंदा गतवर्षीपेक्षा लवकरच धरणात ५० टक्के साठा निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. बलकवडी येथे ४७, उरमोडी २७ आणि तारळी धरण परिसरात ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धोम धरणात ५.२३ टीएमसी, कण्हेर ४.३२, बलकवडी २.१, उरमोडी ४.९२ तर तारळी धरणात २.३६ टीमएसी इतका साठा झाला आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ११ (३४४)
कोयना १२७ (१९८०)
बलकवडी ४७ (९३०)
कण्हेर १७ (३१५)
उरमोडी २७ (३९८)
तारळी ६६ (६७९)
जिल्ह्यात एकूण २३६ मिलीमीटर पाऊस
जिल्ह्यात गुरुवारी पहाटे आणि बुधवारी दिवसभरात एकूण २३६.७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत एकूण सरासरी २१.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा- १६.६ (३२८.५), जावळी- २७.७ (५११.५), पाटण- ३२ (५००.३), कºहाड- ७.२ (२२२.९), कोरेगाव- ४.४ (१६३.४), खटाव - २.३ (१८५), माण- ० (८८.७), फलटण- ० (९३.३), खंडाळा ७.४ (१६०.८ ), वाई- ७.२ (२६४.६) आणि महाबळेश्वर- १३२ (१६०६.२). याप्रमाणे आजपर्यंत एकूण ४१२५.२ तर सरासरी ३७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.