सांडपाणी रस्त्यावरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:41 AM2021-05-21T04:41:00+5:302021-05-21T04:41:00+5:30
सातारा : येथील लक्ष्मी टेकडी परिसरात गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाहक ...
सातारा : येथील लक्ष्मी टेकडी परिसरात गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनाही या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने या परिसराची स्वच्छता करावी, तुंबलेले नाले कचरामुक्त करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
०००००००
अतिक्रमणांना खतपाणी
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. मात्र काही नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी या मोहिमेला खोडा घालत आहेत. शहरातील ठिकठिकाणचे अतिक्रमण पालिकेकडून हटविण्यात आले, मात्र या ठिकाणी पुन्हा नव्याने काही टपऱ्या लावण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर याबाबत विचारणा केल्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जात आहे.
00000
स्कार्फचा वापर
वडूज : माण, खटाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फचा वापर केला जात आहे. शाळा-महाविद्यालयीन तरुणी ड्रेसवर मॅच होतील अशा पद्धतीचे स्कार्फ, ट्रोल खरेदी करत असतात. मात्र यंदा लॉकडाऊन असल्याने त्यांना मनासारखा स्कार्फ खरेदी करावा लागत आहे.
000000
पाणपोईची गरज
दहिवडी : माण तालुक्यात उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सोय करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.