१९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची छाया

By admin | Published: July 6, 2014 11:22 PM2014-07-06T23:22:04+5:302014-07-06T23:22:04+5:30

कोयनेच्या पोटात खड्डा :

Shadow of severe drought, even worse than 1972 | १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची छाया

१९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची छाया

Next

कोयनेच्या पोटात खड्डा : धरण बांधण्यापूर्वीच्या गावठाणांचे अवशेष उघडे; ‘अतिवृष्टीच्या’ महाबळेश्वरची वनराईही तहानली
सूर्यकांत पाटणकर ल्ल पाटण , पावसाने दडी मारल्यामुळे ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणही आटले आहे. पावसाअभावी कोयनेच्या उपनद्याही कोरड्या पडल्या असून, धरणातील जलसाठ्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. धरणात फक्त सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास तेही पाणी संपेल आणि महाराष्ट्रावर १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढवेल. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांच्या विजेची व सिंचनाची गरज भागविणाऱ्या कोयना धरणात केवळ पंधरा दिवस पुरेल एवढा म्हणजेच सात टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाअभावी धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा पूर्णपणे बंद आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पूर्वेकडे दररोज अर्धा टीएमसी पाणी सोडावे लागत आहे. एकीकडे पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सोडावे लागणारे पाणी, पावसामुळे बंद असलेला येवा आणि दुसरीकडे कृष्णा लवादानुसार पूर्वेकडील सांगली पाटबंधारे विभागाला सिंचनासाठी सोडावे लागणारे पाणी यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. आगामी दिवसांत हीच स्थिती कायम राहिल्यास वीजटंचाईसह सिंचनाचाही प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे. राज्य शासनाने १९५६ ते १९६२ या काळात जलविद्युत निर्मितीसाठी हा प्रकल्प बांधला. १०५.२५ टीएमसी पाणी साठवणक्षमता असणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधून केवळ १६० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे, तर १००० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा चौथा टप्पा पूर्णपणे बंद आहे. आणखी पंधरा दिवस पावसाची स्थिती कायम राहिल्यास कोयना प्रकल्पाची वीजनिर्मिती पूर्ण ठप्प होऊन पूर्वेकडील सिंचनाचा प्रश्न उग्र होऊ शकतो.
कोयना धरणाच्या इतिहासात १९७२ आणि १९९५ या वर्षांनंतर यावर्षीच पाण्याची पातळी इतकी खोल गेली आहे. धरणातील खालावत गेलेल्या पाणीपातळीमुळे जुनी गावठाणे उघडी पडली आहेत. जुलै महिन्यात रस्त्यावरून दरवर्षी धरणाचे दिसणारे निसर्गरम्य दृश्य यंदा दिसत नसल्यामुळे जुन्या गावांचे अवशेष पाहून येथील भूमिपुत्र भूतकाळाला उजाळा देत आहेत. त्यांना हे दृश्य काहीसे सुखावणारे असले तरी राज्यातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. एरवी धरणाच्या पाण्यातून तरंगत जाणारे ग्रामस्थ धरणातील उघड्या पडलेल्या गावठाणांच्या अवशेषांमधून उड्या मारत जात आहेत. यावरूनच धरणाच्या स्थितीची भीषणता स्पष्ट होत आहे. शिवसागरावर डौलाने डोलणाऱ्या लाँच आणि तराफाही कोरड्या जमिनीवर विखुरलेल्या दिसत आहेत.

Web Title: Shadow of severe drought, even worse than 1972

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.