शहाबागला माणुसकी आली धावून!

By admin | Published: January 28, 2017 10:41 PM2017-01-28T22:41:02+5:302017-01-28T22:41:02+5:30

परिसर हादरला : आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे

Shahabag humanity has come! | शहाबागला माणुसकी आली धावून!

शहाबागला माणुसकी आली धावून!

Next

संजीव वरे --पसरणी  शनिवारी सकाळी साडेनऊ, दहाची वेळ... वाईच्या शहाबाग परिसरातील नागरिकांचा दिनक्रम हळूहळू सुरू होत होता. याचवेळी एका मोठ्या आवाजाने हा परिसर हादरून गेला आणि काही क्षणातच हळद शिजविण्याच्या बॉयलरचा स्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो स्फोट एवढा मोठा होता की, बॉयलरचे काही अवशेष जवळ जवळ अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पडले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने वाईच्या शासकीय दवाखान्यात नेण्यासाठी मोठी मदत करत माणुसकीचे दर्शन घडविले.
कृष्णा नदीच्या काठी शहाबाग, फुलेनगर या सधन आणि शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या परिसरात व तालुक्यातील काही गावांत शेतकरी उसाबरोबरच हळदीच्या पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतात. वाईची ‘आंबे हळद’ प्रसिद्ध आहे. पर्यटकापासून सर्वांची मोठी मागणी असते. पूर्वीच्या काळी शेतकरी हळदीचे पीक काढल्यानंतर ती शिजविण्यासाठी मोठमोठ्या लोखंडी कढईचा वापर करत. यासाठी दोन-तीन महिन्यांचा हा हंगाम चालायचा. परंतु शेतीमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने उत्पादनात व प्रक्रियेमध्ये मोठे बदल झाले आहेत. सध्या हळद शिजवण्यासाठी बॉयलरचा वापर होऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ व श्रम वाचू लागले व संपूर्ण हंगाम एक ते दीड महिन्यात उरकू लागला; पण हा बॉयलर स्वयंपाकाला वापरण्यात येणाऱ्या गॅसप्रमाणे तसेच भात, डाळ शिजवण्याच्या कूकरप्रमाणे त्याची काळजी घेणे गरजेचे असते. ती न घेतल्यास दरवर्षी लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. परंतु शनिवारचा सकाळचा स्फोट एवढा मोठा होता की, यात लहान मुलासह तीनजण जखमी झाले आहेत.


नागरिकांची धाव..
घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन, रुग्णवाहिकांना फोन केला. उपचारासाठी माणुसकीचे दर्शन दाखवून मोठे सहकार्य केले. यामध्ये प्रदीप जमदाडे, नगरसेवक सतीश वैराट, संग्राम पवार, अमजद इनामदार, सतीश घोडके, शिवा इडलगे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Shahabag humanity has come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.