Shambhuraj Desai: शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा लाल दिवा
By दीपक शिंदे | Published: August 9, 2022 12:43 PM2022-08-09T12:43:30+5:302022-08-09T12:50:02+5:30
महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई यांनी गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती
सातारा : राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार अखेर आज, मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. आज मंत्रिमंडळात भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार शंभूराज शिवाजीराव देसाई यांनी देखील शपथ घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई यांनी गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्येही त्यांना संधी मिळाली आहे.
शंभूराज शिवाजीराव देसाई यांचा परिचय-
नाव - शंभूराज शिवाजीराव देसाई
शिक्षण - पदवीधर
व्यवसाय - उद्योग
>>शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. २००४, २०१४ आणि २०१९ असे तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पाटण मतदारसंघामध्ये पाटणकर आणि देसाई हे परंपरागत राजकीय विरोधक आहेत.
>>शंभूराज देसाई हे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत. त्यांनी १९८६ ते ९६ या काळात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले.
>>१९९२ ते २००२ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९७ ते २००२ मध्ये ते बँक ऑफ महाराष्ट्रचे कौन्सिल सदस्य होते.
>>महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात ते गृहराज्यमंत्री होते. त्यांच्याकडे अर्थ व नियोजन, उत्पादन शुल्क, विपणन, कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास ही खाती होती. तसेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.