कऱ्हाडात ‘बहुजन’चे रणरागिणींसह शंखध्वनी आंदोलन : तहसीलपुढे ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:59 AM2018-03-09T00:59:32+5:302018-03-09T00:59:32+5:30

कऱ्हाड : जागतिक महिला दिन साजरा करीत एकीकडे लोकशाही भारतात दुसरीकडे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील वंचित-निराधार, बेघर अशा विधवा, वृद्धमाता, शेतमजुरांवर शासकीय योजनांपासून वंचित

 Shankhvagni movement with 'Ranjanigans' of 'Bahujan' in Tehsil: Tehsil | कऱ्हाडात ‘बहुजन’चे रणरागिणींसह शंखध्वनी आंदोलन : तहसीलपुढे ठिय्या

कऱ्हाडात ‘बहुजन’चे रणरागिणींसह शंखध्वनी आंदोलन : तहसीलपुढे ठिय्या

Next
ठळक मुद्देशासनाचा निषेध; तहसीलदारांना प्रमुख मागण्यांबाबत साकडे

कऱ्हाड : जागतिक महिला दिन साजरा करीत एकीकडे लोकशाही भारतात दुसरीकडे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील वंचित-निराधार, बेघर अशा विधवा, वृद्धमाता, शेतमजुरांवर शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ महिलांनी गुरुवारी बहुजन सामाजिक विकास संस्थेच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर शंखध्वनी आंदोलन केले.

बहुजन संस्थेचे अध्यक्ष संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली महिला दिनी आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाच्या नावाने बोंब ठोकत महिलांनी निषेध दर्शविला. यावेळी सारिका जाधव, वैशाली माने, कल्पना लोळे, अपर्णा भोसले, चंद्रकांत आवळे, शिवाजी लोंढे, सारिका मोहिरे, सारिका बनसोडे, संगीता सकट, पुष्पा वाघमारे यांच्यासह सुमारे तीनशेहून अधिक महिला, वयोवृद्ध स्त्रियांची उपस्थिती होती.

येथील तहसील कार्यालयावर गुरुवारी दुपारी एक वाजता केलेल्या निषेध आंदोलनाद्वारे महिलांनी तहसीलदार राजेंद्र शेळके व निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांना निवेदन दिले. मोर्चात तीनशेहून अधिक महिला, वयोवृद्ध स्त्रिया, लहान मुलेही उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित महिलांनी तहसील कार्यालयासमोरच जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत उठणार नाही, असा निर्णय घेत ठिय्या मांडला. मागण्यांबाबत संतोष माने व तहसीलदार राजेंद्र्र शेळके, निवासी नायब तहसीलदार अ२िजत कुराडे यांच्याशी चर्चा केली.

अन् कांताबाई पवार यांना रडू कोसळलं
कºहाड तहसील कार्यालयावर महिलादिनी महिलांनी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनात गायकवाडवाडी येथील कांताबाई पवार यांही आल्या होत्या. त्यांचा मुलगा अपंग असून, त्यांना रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे त्यांनी शासनाकडे अनेकवेळा पेन्शन, घरकूल तसेच रोजगाराबाबत अर्ज केले. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महिलादिनी तरी आपल्याला न्याय द्यावा, असे सांगत त्यांना रडू कोसळले.

सातव्या वेतन आयोगापेक्षा महिलांना रोजगार द्या
शासनाकडून अधिकाºयांना सातवा वेतन आयोगाद्वारे पगारवाढ दिली जात आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून घरकूल, पेन्शन, रोजगार अशा महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी वयोवृद्ध महिला, बहुजन समाजातील महिला लढा देत आहेत. त्यांना महिलादिनीतरी रोजगार द्या, न्याय द्यावा, अशी मागणी बहुजन संस्थेचे अध्यक्ष संतोष माने यांनी आंदोलनादरम्यान केली.

महिलांच्या प्रमुख मागण्या
शासनाने बेघर, विधवा महिलांना पेन्शन द्यावी.
बेघर योजनेच्या जाचक अटी शिथिल कराव्या.
बेघरांचे पुनवर्सन करावे.
बहुजन समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करावे.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत महिलांना लाभ द्यावा.

Web Title:  Shankhvagni movement with 'Ranjanigans' of 'Bahujan' in Tehsil: Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.