ब्रीज कोर्सच्या माध्यमातून चिमुकल्यांच्या स्वप्नांना आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:18+5:302021-06-10T04:26:18+5:30

डॉ.स्वाती थोरात यांचे प्रतिपादन स्वाती थोरात : आदर्श प्राथमिक विद्यालयाचा अनोखा उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : आदर्श प्राथमिक ...

Shape Chimukalya’s dreams through a bridge course | ब्रीज कोर्सच्या माध्यमातून चिमुकल्यांच्या स्वप्नांना आकार

ब्रीज कोर्सच्या माध्यमातून चिमुकल्यांच्या स्वप्नांना आकार

Next

डॉ.स्वाती थोरात यांचे प्रतिपादन

स्वाती थोरात : आदर्श प्राथमिक विद्यालयाचा अनोखा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : आदर्श प्राथमिक विद्यालय, मलकापूर शाळेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद; पण शिक्षण सुरु ठेवले. या उपक्रमांतर्गत उन्हाळी सुट्टीत व टाळेबंदीच्या काळात बालवाडी ते चाैथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन समृद्ध करण्याच्या दृष्टीने ब्रीज कोर्स अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे ऑनलाईन पद्धतीने ज्ञानदान करत चिमुकल्यांच्या स्वप्नांना आकार दिला,’ असे प्रतिपादन संचालिका डॉ. स्वाती थोरात यांनी केले.

या उपक्रमाचा ऑनलाईन समारोप संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती शिंदे, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

विद्यालयाने प्राथमिक गटात स्वतःची स्वतंत्र वेबसाईट विकसित केली आहे. गतवर्षाप्रमाणे याहीवर्षी विद्यालयाने ऑनलाईन प्रवेश लिंक तयार करून बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थिनींचा प्रवेश निश्चित केला आहे. विद्यालयाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या, असे आवाहन मुख्याध्यापिका ज्योती शिंदे यांनी केले आहे.

या उपक्रमात सुंदर हस्ताक्षर उपक्रम अंजनी भोसले, ग्रहण एक खगोलीय घटना स्मिता सावंत, कार्यानुभव कागदकाम मनीषा माने, कोरोना काळात मुलांची काळजी कशी घ्यावी जयश्री तडाखे, जीवनातील संस्कारांचे महत्त्व स्वाती थोरावडे, जीवनातील खेळाचे महत्त्व हेमंत शिर्के, चित्रकला राजेंद्र पांढरपट्टे, शालेय उपक्रम मुख्याध्यापिका ज्योती शिंदे यांनी आपापल्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ताणतणाव व्यवस्थापन डॉ. शर्वरी बेलापुरे, मुलांचा अभ्यास कसा घ्यावा वर्षा कुलकर्णी, गंमत विज्ञानाची - संजय पुजारी, कल्पना चावला विज्ञान केंद्र, कऱ्हाड, आपले आरोग्य आपल्या हाती मार्गदर्शक डॉ. स्वाती थोरात या तज्ज्ञ मान्यवरांनी चिमुकल्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनमोल मार्गदर्शन केले.

चौकट..

विद्यार्थ्यांचा ऑनलाईन गौरव

या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने ऑनलाईन उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला. घरात राहून मुले कंटाळू नयेत, यासाठी पाककला, वाचन स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, कागदकाम अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले. मंथन परीक्षेत राज्यस्तरीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन गुणगौरव केला. संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांच्यासह संचालक मंडळाने विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Web Title: Shape Chimukalya’s dreams through a bridge course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.