शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 11:46 AM2020-08-09T11:46:56+5:302020-08-09T12:39:59+5:30
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला होता. त्यावेळी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांची भेट घेतली होती.
सातारा : सातारा आणि कोल्हापूर येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कराड येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठक सुरु झाली आहे. मात्र, बैठकीला बोलावत नाहीत, म्हणून नाराजी व्यक्त करणारे राज्यसभा खासदार उदयनराजे अनुपस्थित राहिले आहेत. तर दुसरीकडे शिवेंद्रराजे बैठकीला आले आहेत.
कोरोना वरील आढावा बैठकीला राजेश टोपेंसह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई , कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री (शहर ) सतेज पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील हे उपस्थित आहेत. याचबरोबर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिकही उपस्थित राहिले आहेत. मात्र, उदयनराजे यांनी याकडे पाठ फिरविली आहे.
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला होता. त्यावेळी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. आताही त्यावेळी शिवेंद्रराजे बैठकीला उपस्थित असून त्यांची पवारांशी जवळीक वाढत असल्याचे बोलले जात आहे. तर या बैठकीला बोलावले नसल्याची नाराजी उदनराजेंनी व्यक्त केली होती. तेव्हा त्यांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. मात्र, आजच्या बैठकीलाही उदयनराजे अनुपस्थित आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, उदयनराजे साताऱ्यातच असून ते आज दिल्लीला रवाना होणार असल्याचे समजते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'
रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट
Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग
BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत
उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक एन्काऊंटर; भाजपा आमदार हत्याकांडातील गँगस्टरचा खात्मा
आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2020; वृषभ राशीच्या लग्नाळुंसाठी विवाहाचे योग
नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा
मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...