नव्या लढाईसाठी ‘प्रीतीसंगम’च का?; अजित पवारांनीही केला होता आत्मक्लेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 07:12 AM2023-07-04T07:12:42+5:302023-07-04T07:12:55+5:30
स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट करतानाच महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली.
प्रमोद सुकरे
कऱ्हाड (जि.सातारा) : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना ज्येष्ठ नेते शरद पवार गुरुस्थानी मानतात आणि अख्खा महाराष्ट्र पवारांना यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून ओळखतो. ज्या-ज्या वेळी पवार एखादी नवीन गोष्ट करतात त्या-त्या वेळी ते कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक व्हायला येतात. आता राष्ट्रवादीत ‘धाकट्या’ पवारांनी भूकंप केल्यानंतर ‘थोरले’ पवार सोमवारी कऱ्हाडला आले.
स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट करतानाच महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली. कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ उभारले आहे. हे स्मृतिस्थळ महाराष्ट्राची जणू राजकीय पंढरीच बनली आहे. यशवंतरावांच्या पत्नी वेणूताई चव्हाण यांचे स्मारकही येथे उभारले आहे.
अजित पवारांनीही केला होता आत्मक्लेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील २००८-२००९ मध्ये यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी आत्मक्लेश केला होता. एका भाषणामध्ये बोलताना अजित पवारांची जीभ घसरली होती. त्यावर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी बसून आत्मक्लेश केला होता.