जखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:01+5:302021-07-10T04:27:01+5:30
मलकापूर : विंग व शिंदेवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केवळ दीड किलोमीटर अंतरात शुक्रवारी बिबट्याने हल्ला करून ...
मलकापूर : विंग व शिंदेवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केवळ दीड किलोमीटर अंतरात शुक्रवारी बिबट्याने हल्ला करून मेंढपाळाच्या कळपातील मेंढी ठार केली. जखिणवाडी (ता. कऱ्हाड) येथील धायटीचा माळ नावाच्या शिवारात अधिकराव निवास पाटील यांच्या शेतात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पाळीव प्राण्यांवर हल्ला होत असल्यामुळे जखिणवाडी विभागात बिबट्याची दहशत कायम आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार आगाशिव डोंगर पायथ्याला जखिणवाडी गावापासून काही अंतरावर धायटीचा माळ नावाचा शिवार आहे. या शिवारात अधिकराव निवास पाटील यांचे शेत आहे. पाटील यांच्या शेतात जखिणवाडी येथील दिनकर यशवंत येडगे यांचा मेंढरांचा कळप बसवला होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी येडगे मेंढ्या वाघरीमध्ये बांधून झोपले होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मेंढरांचा गोंधळ झाल्यामुळे ते जागे झाले आसता एका मेंढीच्या नरड्याचा चावा घेऊन ठार केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची खबर येडगे यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपाल ए. पी. सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याने मेंढरांवर हल्ला केल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात बिबट्याचा सततचा वावर असल्यामुळे आगाशिव डोंगर पायथ्याच्या गावात बिबट्याची दहशत कायम आहे.
(चौकट)
वर्षात अनेकवेळा हल्ला!
जखिणवाडी गावाच्या पश्चिमेकडील शिवारात अनेकवेळा बिबट्याने शेळ्या ठार केल्या आहेत. गेली काही महिन्यात येडगे यांच्याच शेतातील वस्तीवर पाच शेळ्या ठार केल्या होत्या. गेल्यावर्षीही मेंढपाळासमोरच दोन बिबट्यांनी हल्ला करत दोन मेंढ्यांसह श्वान ठार केले होते. त्यामुळे जखिणवाडीच्या पश्चिम भागात वर्षातून अनेकवेळा पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याचे समीकरणच झाले आहे.
(चौकट)
बारा हजारांचे नुकसान
जखिणवाडी येथील येडगे यांच्या कळपातील दोन मेंढ्या ठार झाल्या. मेंढी गाभण असल्यामुळे या पाळीव जनावरांची पंचाच्या मते बाजारभावाप्रमाणे सुमारे १२ हजारांवर किंमत होते. येडगे यांनी सांभाळ केलेली मेंढी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे त्यांचे सुमारे किमान १२ हजारांचे नुकसान झाले आहे.
०९मलकापूर बिबट्या
जखिणवाडी (ता. कऱ्हाड) येथील धायटीचा माळ नावाच्या शिवारात अधिकराव पाटील यांच्या शेतात दिनकर येडगे यांच्या मेंढ्यांच्या कळपातील एक मेंढी बिबट्याने ठार केली. ( छाया : माणिक डोंगरे )
090721\img-20210708-wa0017.jpg
फोटो कॕप्शन
जखिणवाडी ता. कराड येथील धायटीचा माळ नावाच्या शिवारात अधिकराव पाटील यांच्या शेतात दिनकर येडगे यांच्या मेंढ्यांच्य कळपातील एक मेंढी बिबट्याने ठार केली. ( छाया -माणिक डोंगरे )