‘कोरेगाव श्री’ चा फैय्याज शेख मानकरी

By Admin | Published: February 13, 2015 12:19 AM2015-02-13T00:19:56+5:302015-02-13T00:49:31+5:30

स्पर्धेत साठजण सहभागी : विजेत्यांना पारितोषिक, चषक प्रदान

Sheikh Mankari, the chef of 'Koregaon Shree' | ‘कोरेगाव श्री’ चा फैय्याज शेख मानकरी

‘कोरेगाव श्री’ चा फैय्याज शेख मानकरी

googlenewsNext

कोरेगाव : येथील शुभेच्छा मित्र समूहातर्फे झालेल्या ‘कोरेगाव श्री २०१५’ या स्पर्धेत सातारच्या फैय्याज शेख याने विजेतेपद पटकाविले. विजेत्या फैय्याज शेखला ‘कोरेगाव श्री’ किताबासह पाच हजारांचे पारितोषिक व चषक देण्यात आला.
स्पर्धेत जिल्ह्यातील साठ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर बाचल, मराठा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य अरुण बर्गे, जाणीव मित्र समूहाचे अध्यक्ष रामभाऊ घारगे, शुभेच्छा मित्र समूहाचे संस्थापक नीलेश बर्गे, मराठा मित्र मंडळाचे संस्थापक सी. आर. बर्गे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब डेरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रदीप बर्गे, दिलीप वेलियाविट्टील, नवनीत मर्दा, विनायक मोरे यांच्या उपस्थितीत झाला.
सहा गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत अशोक शिंदे (कऱ्हाड), सुशांत मसूरकर (पाटण), रामा मैनाक (कऱ्हाड), फैय्याज शेख (सातारा), नवनाथ सावंत (सातारा), सागर शिंदे (सातारा) हे सहाजण आपापल्या गटात यशस्वी ठरले. स्पर्धेच्या शेवटी यातून फैय्याज शेखने बाजी मारत सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेच्या विजेत्यापदाचा किताब पटकाविला. ‘बेस्ट पोझर’चा किताब मोहसिन शेख (कोरेगाव) तर ‘बेस्ट मस्कुलर’ रामा मैनाक यांना गौरविण्यात आले. पंच म्हणून सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स, अ‍ॅड. नितीन माने, अमित कासट, अजित सांडगे, शार्दुल टोपे व सईद कुरेशी यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आशिष क्षीरसागर, अमोल रानभरे, दिनेश कोपर्डे, रामभाऊ देवकर, विनोद चव्हाण, संदीप घोरपडे, महेश पतंगे, कुमार शिंदे, किशोर अहिवळे, विक्रम कदम, विनोद जाधव, प्रणव पतंगे, विश्वनाथ गंजाळ, संदेश कुलकर्णी, औदुंबर पवार, संतोष देशमुख, विजय देशमुख, निखील वीर, विक्रम जगदाळे, विजय बर्गे, योगेश पवार, अनिल जाधव यांनी परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण डॉ. दिलीप घोडके, राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, मिलिंद बर्गे, बाबूजी बर्गे, पी. एस. पवार, अजय बर्गे, बाळासाहेब माने, बिपीन ओसवाल, सचिन जाधव यांच्या उपस्थितीत झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Sheikh Mankari, the chef of 'Koregaon Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.