शेखर गोरेंच्या प्रवेशाला राष्ट्रवादी नेत्यांची फौज
By admin | Published: October 26, 2016 11:05 PM2016-10-26T23:05:19+5:302016-10-26T23:05:19+5:30
मुंबईत सोहळा : निवडणुका ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार; माण-खटावमध्ये पक्षाला बळकटी मिळणार असल्याचा अजितदादांचा दावा\
दहिवडी : ‘शेखर गोरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे माण-खटाव तालुक्यांत राष्ट्रवादीची ताकद वाढली असून, येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सर्व ताकदीनिशी लढा,’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. मुंबई येथील राष्ट्रवादी भवनामध्ये शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, दिलीप वळसे, नवाब मलिक, सुभाष शिंदे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘शेखर गोरे यांना सातारा-सांगली विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. पक्षाचे कार्य नेटाने व्हावे हा या पाठीमागचा उद्देश असून, माण-खटावमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम पक्ष करणार आहे. जुन्या नव्याचा संगम करून जो उमेदवार योग्य असेल, अशा व्यक्तीची तुम्ही सगळ्यांनी मिळून पक्षाला दोन्ही खासदार जनतेने निवडून दिले आहे. येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादीचा आमदार माण-खटावसाठीनिवडून आला पाहिजे. यापुढे शेखर गोरे मित्र मंडळ न
म्हणता राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणा. माजी मंत्री शरद पवार,
सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करा. जुना-नवा असा भेदभाव करून नका. अडचणी आल्यास आम्हाला सांगा. हलक्या काळजाचे कार्यकर्त्यांनी न होता संयमाने
घ्यावे.
युतीचे शासन दोन वर्षे झाले आले आहे. या शासनाच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीला भाव नाही. उद्योगधंदा नाही, महिलांना सुरक्षितता नाही, पोलिस सुरक्षित नाहीत, या शासनाबद्दल प्रचंड रोष जनतेमध्ये आहे. ज्या-त्या शेतकऱ्यांना आता शरद पवार यांची आठवण येत आहे. आपले विचार तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे.
शशिकांत शिंदे म्हणाले, ‘शेखर गोरे यांच्या प्रवेशाने माण-खटावमधील राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. यापुढे जुना व नवा असा भेदभाव न करता सर्वांना एकत्रित घेऊन दिशा ठरवली जाईल.’
यावेळी सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, डॉ. संदीप पोळ, युवराज सूर्यवंशी, सुनील पोळ, विलास सावंत,
वीरभद्र कावडे, अरुण शिंदे, डॉ. सतीश
शहा, मोहन बनकर, लक्ष्मण सूर्यवंशी, प्रदीप जाधव, पंढरीनाथ जाधव,
जयंत कुबरे, तानाजी जाधव,
तेजस पवार, राजेंद्र जाधव, दत्ता
घाडगे, गणेश सत्रे, गोरखनाथ मदने,
सतीश मडके, संग्राम शेटे, रमेश शिंदे, कुमार पोतेकर, बशीर मुलाणी, आप्पासो बुधावले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुन्हा तीच ताकद उभी करायची आहे...
‘सातारा, सांगली विधान परिषदेची निवडणूक शेखर गोरे लढवित असून, जयंत पाटील यांच्या सारख्या प्रामाणिक व ज्येष्ठ नेत्यांनी सांगलीची जबाबदारी उचलली आहे. सातारा जिल्ह्यातही मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, दीपक चव्हाण यासारखे आपल्या सोबत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आपण ताकदीने उतरणार आहात. समोर कोण आहे हे न पाहता पक्षाशी ठाम राहून काम झाले पाहिजे. ती जबाबदारी शेखर गोरे निश्चित पणे पाळतील. त्यांना आम्ही सर्व ताकद पुरवू. दिवंगत सदाशिवराव पोळ यांनी अनेकांना आमदार केले. तिच ताकद पुन्हा उभी करायची आहे, अशी भावना माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.